वेळ काही पूरत नाही....
आयुष्य वाढते वेळ काही पुरत नाही, राहिलेल्या कामांची लिस्ट काही संपत होत नाही ! बालपणीच्या, तरुणपणीच्या, नोकरी करत असतानाच्या, आठवणी लिहायला वेळ काही पुरत नाही! मित्र,मैत्रिणीचे लहानपणीचे चेहरे आठवतात, प्रत्यक्ष भेटीत ओळखता येत नाही! नव्या जगात नव्या युगात मोबाईल वरील खंडीभर ॲप मुळे, प्रत्यक्ष भेटायची वेळच येत नाही! जुन्या वस्तू ,जुने फोटो कसे जतन करून ठेवावे कळत नाही, अँटिक वस्तूंची नवीन पिढीला गरज नाही! काळ बदलला माणसे बदलली, आमची पिढी मात्र तशीच राहिली! राम केळकर बावधन पुणे.