आमचे पूर्वजांचे खालचे घर येथे मी जन्मलो आणि आयुष्याची सहा वर्ष राहिलो

आमचे पूर्वजांचे खालचे घर....प्रथम मी, शिवराम विनायक केळकर उर्फ राम केळकर..कारण मला सर्वजण राम नावांनीच घरात आणि गावात ओळखायचे आणि आता पण ओळखतात.अगदी सहा साडेसहा वर्षाचा होईपर्यंत आमच्या पहिल्या मूळ घरात एकत्र कुटुंबात जन्मापासून राहत होतो. त्याला आम्ही खालचे घर म्हणायला लागलो. वरती नवीन घर बांधल्यावरती! एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मी माझे वडिलांचे  काकू, काका, तीन आजा माझी भावंड म्हणजे ताई मोठा भाऊ दिलीप आणि दत्ता आणि आई बाबा तीन काका तीन आत्या आणखी काही नातेवाईक असं खूप मोठं गजबजलेलं घर असायचं. घराच्या बाजूला मोठा गोठा होता. त्यामध्ये भरपूर काही म्हशी बैल रेडे असे होते आमच्या दोन बैलगाड्या होत्या.सर्व शेती घरीच होत होती.घराच्या मागे मोठी नारळी पोफळी आणि केळीची बागं होती. खूप मोठी विहीर होती.विहिरीला रहाट गाडगे जोडलेलं असायचं.त्याच्यातून चिरेबंदी दगडाच्या द्रोणी मध्ये भरपूर पाणी येत असे. दोन बाजूला दोन द्रोणी होत्या . द्रोणीला लागूनच नहाणी घर होतं . एक रेडा दिवसभर रहाट गाडग्याला जोडलेला असायचा. ओव्हर फ्लो होत असलेले पाणी नारळ केळी आणि पोफळी च्या बागांना जात असायचे.घरघडी त्यातून त्यांना मार्ग द्यायचा,त्याच्या हातात फावड असायचं पाट वळवायण्या साठी .एका झाडावर झाले की दुसऱ्यासाठी. आणखीन दोन-तीन गडी होते दोन गाड्यांसाठी दोन. ते गाई बैल,म्हशी यांची देखभाल करून त्यांना वैरण बनवून खायला पाणी देणे हे काम करायचे आणि बागेतील इतर कामे. खूप मोठं घर होतं घराच्या तीन बाजूला पडवी होती. पुढील पडवीत दोन रूम एका आजी साठी. त्याना माई म्हणत पांढरी साडी नेसायच्या. (आणखीन एक वडिलांची आजी आंधळी होती ती लाल साडी नेसायची. बिचारी पण सर्व काम करायचे. अगदी सोहळ्यांनी विहिरीपासून पाणी घागर घेऊन. ती आम्हाला सर्व लहान मुलांना रात्री झोपाळ्यावर बसून शुभम करोति झाल्यानंतर खूप लांब लांब अशा खूप दिवस चालतील अशा छान छान गोष्टी सांगायची. त्यातील एक गोष्ट तर एका फाटक्यात सात ठार हि मला अजून आठवते. आणखी त्याच्या राजकुमार,राजकुमारी वगैरे गोष्ट सांगायची खूप लांबलतक असायची कित्येक दिवस चालायची. ती भाजी चिरणे ते सुद्धा दिसत नसताना करायची. एका आजीला माई आजी असं म्हणायचं . दुसऱ्या आजीला नुसता आजी( ती आंधळी होती.) त्यानंतर झोपाळा त्याच्यानंतर उजव्या बाजूला दोन दहा बाय दहा बाय आठ अशी लाकडाची मोठी कोठार होती. त्यामध्ये भात धान्य साठवलं जायचं. त्याला वरच्या बाजूला धान्य काढण्यासाठी दोन दरवाजे होते खूप मोठे नाही साधारण दोन बाय दोन चे असावेत. मी ते उघडून कधीतरी भारतामध्ये जाऊन बसत असे लपण्यासाठी 🤣 त्यानंतर उजव्या बाजूच्या पडवी मध्ये एक खोली होती त्यानंतर बरीच जागा सोडल्यानंतर डाव्या बाजूला पाठीमागच्या पडवीत एक स्वयंपाक खोली होती. तसेच उजव्या पडवीच्या बाजूला साधारण पंधरा बाय पंधरा फुटाची आणखीन एक छोटीशी खोली बांधलेली होती. पाठीमागच्या पडवी मध्ये गडी जेवत असत. कित्येक वेळात त्यांच्या ताटामध्ये जाऊन मी पण एखाद दुसरा घास घेत असे त्यांच्याकडून बहुदा गणपतच्या जवळच बसायचं. तिथून पाठीमागे एका छोट्याशा पडविच्याच भागामध्ये गरम पाण्याचा  बंब असायचा. पूर्वीच्या काळात तांब्याचा! खूप मोठा. तिथून विहिरीचा रस्ता अगदी जवळ पंधरा-वीस फुटावर विहीर होती. विहिरीच्या पुढे आणखी काही पावलावर दोन संडास आणि एक लहान मुलांसाठी ठाकुरल्या होत्या प्रातर्विधी करण्यासाठी!  मुख्य दरवाजातून आत शिरल्यानंतर ओटी होती.त्याच्या एका बाजूला दहा बाय दहा फुटाचे देवघर मोठ्या देवघरात दोन बाजूला दोन मोठ्या समया वरच्या बाजूला टांगून ठेवलेले लाकडाचे चौकट असायची. त्याच्यामध्ये देवाचे साहित्य आणि सोवळे पोथ्या असे प्रकार असायचे. ओटीच्या उजव्या बाजूला एक मोठी खोली होती त्याच्यामध्ये मोठी तिजोरी ठेवलेली असायची. काळोखाची खोली म्हणून म्हणायचं आम्ही. त्याच्या समोरच माजघर.मध्ये तिजोरीच्या खोली समोरच बाळंतिणीतिची खोली असायची. माझजघरा मध्ये आम्ही सर्व लहान मुले म्हणजे काका आत्या आम्ही भावंड सकाळी मेतकूट तूप भात आणि पापड लिंबाचं लोणचं अशी न्याहारी करायचं.  संध्याकाळी सहा साडेसहाला शुभंकरोती म्हणून झाल्यानंतर खाली बसून जेवायचं माजघरांमध्येरात्री मोठी माणसे जेवायची. त्याला जोडूनच असलेल्या मोठ्या स्वयंपाक घरात एक मोठा खांब होता. तिथेच एका मोठ्या चिनी मातीच्या खूप मोठ्या बरणीमध्ये हाताने दोरी लावून ताक घुसळले जाई. खूप गाई म्हशी असल्यामुळे भरपूर दूध दही होते. स्वयंपाक घरामधून माडीवर जाण्यासाठी एक जिना होता. ओटी वरून वरच्या मजल्यावर (माडी म्हणत) जाण्यासाठी एक जिना होता त्या जिन्याला लागूनच एक खूप मोठी माडी होती. त्याला दोन मोठ्या खिडक्या होत्या. तिथूनच बाजूला म्हणजेच स्वयंपाक  घराच्या आतल्या आणि माज घराच्या वरती एक मोठा माळा होता. त्याच्यामध्ये वाळलेले नारळ नंतर मोठमोठ्या दोन-तीन पेटार्‍या मध्ये मोठ-मोठी भांडी ठेवलेली असत. तेव्हा खूप माणसं सुट्टीमध्ये येत तेव्हा ती कामाला येत असत. माडी वर एक मोठा पलंग होता त्याच्या बाजूला एका मोठ्या कपाटा वर रेडिओ ग्रॅम आणि खूप रेकॉर्ड होत्या. रेकॉर्ड वरती आम्ही खूप गाणी ऐकली आहेत.त्याच्या पिना खूप वेळा बदली करायचा लागायच्या. आणि हाताने त्याला चावी द्यायला लागायची. खूप छान असा तो एचएमटी चा रेकॉर्ड होता. अनारकलीच्या सर्व रेकॉर्ड ऐकलेल्या आम्ही आहेत. साधारणपणे विभावरी आत्या त्या लावायची.मोठा भोंगा लावलेला होता त्याच्यावरती. पुढील अंगण खूप मोठे होते त्याच्यामध्ये उत्तरेच्या बाजूला एक तुळशीचे मोठे वृद्धावन होते. कधी कधी मला देवांची पूजा केल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माल्य टाकावी लागायचे त्याच्याबरोबर माझ्या हातून कित्येक वेळा नर्मदेतील शाळीग्राम गोटे छोटे छोटे असल्याने विसर्जित व्हायचे .मग मोठ्या कोणी माणसांनी पूजा केल्यानंतर त्यांच्यातील लक्षात घ्यायचे देव कमी आहेत आणि मी पूजा केलेली कळली तर हमखास ते वृंदावना मध्ये सापडायचे. कितीतरी देव असल्यामुळे पूजा करायला तासभर लागायचा. मोठ्या अंगणाच्या बाजूला एक मोठा बकुळीचा वृक्ष होता. त्याची रोज सकाळी खूप फुले अंगणभर पसरलेली असायची. त्याची पिवळी तांबूस झालेली फळे खाण्यासाठी खूप पक्षी येत असत .खाली पडलेली फळ आम्ही खात असू थोडीशी तुरट! दक्षिणेच्या बाजूला एक कमान होती त्याच्यावरती मधु मा लतीचा वेल सोडलेला असायचा.खूप छान दिसायची ती , ताई आत्या वगैरे मुली त्याचा गजरा बनवायची डोक्यात घालायला. पुढल्या अंगणात दोन पारिजातकाची झाड होती आणि पश्चिमेकडील अंगणात देखील एक होतं. सकाळी अंगणभर फुले पडलेली होती आम्ही ती वेचून देव उद्यासाठी गोळा करून आणायचं तसेच काही जास्वंदीची व इतर फुले पण असायची. दुर्वाना तर तोटात नसायचा. घराच्या अंगण्याच्या बाजूला भरपूर दुर्वा उगवत असत.घराच्या पूर्व बाजूला नारळी पोफळीची मोठी बाग होती. त्या बागेमध्ये आम्ही दुपारनंतर खेळत असू. मीना आत्याच्या मैत्रिणी देखील त्याबागे मध्ये खेळायला येत असत.भाततूकली! हे सर्व थोड थोडं आठवतंय!मीनाआत्या माझ्यापेक्षा थोडी मोठी असल्यामुळे तिला कदाचित हे सर्व आठवत असेल. त्या बागेतच शिवरीच्या कापसाचे एक दोन झाडं होती. शिवरीच्या झाडाचे कापूस पडल्यानंतर त्याच्या बोटीच्या सारखा आकाराच्या वाट्या खाली पडत. आम्ही बोट म्हणून त्याच्याबरोबर खेळायचं. दक्षिणेकडील दुसऱ्या पडवीच्या साईडच्या अंगणामध्ये आम्ही आट्यापाट्या सुद्धा खेळत असू. एकदा लहानपणी विटी दांडू खेळताना एक माझी विटी तेथील राना मध्ये जाऊन पडली त्यामुळे आम्ही म्हणजे मी आणि मोठा भाऊ दिलीप ते गवत कापायला लागलो, गवत कापता कापता एक मोठा साप तेथे समोर आला आम्ही दोघांनी  भात कापायचं अवजार तिथे टाकून धावत दक्षिणेकडील दारातून घरात शिरून टेबलावरती उभा राहिलो. नंतर गड्यांनी सापाला शोधून मारले. घोणस होता असं कळलं!! थोडा मोठा झाल्यावर  हे समजलं मला की साप किती विषारी होता ते.... एकदा तर आमच्या रामेश्वर मंदिराजवळ असलेल्या पूर्वजांच्या पादुकांची पूजा करताना आमचे दादा म्हणजे माझे  वडील  पूजा करायला जात असताना मी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो त्याला माहिती नव्हतं मी तिथून वाटेतच असलेल्या आऊ आजीच्या घरात जाऊन बसलो. जेवायच्या वेळेला घरात दुपारी शोधाशोध झाली तेव्हा कळलं की राम घरात दिसत नाही सर्वांकडे शोधाशोध झाल्यानंतर मी आऊ आजीकडे सापडलो. अडीच तीन वर्षाचा असावा.  दोन-चार वर्षांपूर्वी अलीकडेच  ते खालचेघर नवीन बांधल्यावर देखील तो मी म्हणजे त्या फोनची मशीन चालू असलेलं बघितलं होतं. तसेच आमच्याकडे लहानपणी जिन्याच्या बाजूला एक शेंगा फोडण्याचा मशीन देखील होतं. आमची पिठाची गिरणी असल्यामुळे त्या गिरणीसाठी ते आणलेलं असावं. आमची ही गिरणी आमच्या पंचक्रोशीतील मोठ्या दुकानाच्या बाजूलाच होती. आमच्या दुकानाचं नाव मेसर्स शिवराम विनायक केळकर आणि कंपनी असं होतं.... अशा असंख्य खालच्या घरच्या आठवणी माझ्याकडे अजून आहेत. सर्व घेत बसलो तर कोणाला वाचायला देखील जमणार नाही...... ते दिवस छानच होते!!                                                पंचक्रोशीतील सर्वात मोठा दुकान!... राम केळकर मरीन इंजिनियर पुणे बावधन

Popular posts from this blog

मालगुंड मधील आमच्या लहानपणीचे कमळाचे तळे

मोबाईल पेंटिंग एक छंद...