Posts

जीवन सुंदर आहे!

जीवन सुंदर आहे! आनंदी आहे!!नक्कीच, जीवन सुंदर आहे! जीवन हे एक अद्भुत प्रवास आहे. या प्रवासात आनंद, दुःख, यश, अपयश, प्रेम,  असे अनेक रंग असतात. या रंगांची सांगड घालूनच आपले जीवन सुंदर बनते. जर तसं वय वाढत I 8ouhkk(8जाते तसे तसे आपल्याला खूप अनुभव अनुभवायला मिळतात. प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. मी बोटी वरती मरीन इंजिनियर म्हणून नोकरी केली तिथेच साहस म्हणजे काय हा अनुभव आला. वेगवेगळ्या प्रकारची वादळे, अपघात, हे अनुभवत असताना देखील समुद्र, आकाश, चंद्र, सूर्य ,तारे क्वचित तूटणाऱ्या तारका यांचे विलोभनीय वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य पण मनाला आनंद देऊन जायचे. सूर्योदय सूर्यास्त यांचे आकाशा मध्ये थोड्या थोड्या अंतराने बदलणारे रंग मनाला आनंदित करून जात असत. वादळात हेलकावत असणाऱ्या बोटीवर हमखास सर्व आप्त आणि मित्रांची आठवण होते. कारण पुढे काय होणारे हे आपल्याला माहिती नसते. सर्व आपापल्या देवावर विश्वास ठेवून असतात. त्याला साहस साथ देते!घाबरून न जाता संकटाशी चार हात करायला धीर देतात. बोटीचा प्रवास चालू असताना ड्युटी शिवाय इतर 16 तास प्रत्येक जण आपले छंद जपत असतात. काहीना गाण्याची आव...

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

Image
आमची शाळा 175 वर्षाची झाली म्हणून आपण श्री गणेशा जिथून शिकलो त्याबद्दल काही लिहाव असे वाटले म्हणून हा लेख लिहीत आहे.आत्ताची मालगुंड ची जीवन शिक्षण शाळा ही पूर्वी पूर्ण प्राथमिक शाळा मालगुंड या नावाने होती, शाळेची स्थापना १९५१ साली झाली. पाच जून रोजी या शाळेला १७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या शाळेबद्दल हा लेख मी लिहीत आहे. १९५५ साली मी या शाळेत पहिली मध्ये दाखल झालो. म्हणजे सुमारे ७५ वर्षापूर्वी. गणपतीपुळे खाडी पार करून मालगुंड मध्ये शिरल्यानंतर पुढे काही अंतरावरच डाव्या बाजूला आमची ही जीवन शिक्षण शाळा आहे. त्यावेळी इंग्रजीची C आकारामध्ये दगडी बांधकामाची मजबूत होती आणि आताही अशीच आहे. जमिनी शेणाने सारवलेल्या  असत, प्रत्येक विद्यार्थी आपली बैठक गोणपाटाची घेऊन येत असत. शाळेच्या पुढील भागामध्ये एक सुंदर बाग होती. आम्ही शाळेत जायला लागल्या नंतर काही वर्षांनी त्या बागे मध्ये झोपाळा, गोलाकार फिरणारे चक्र, सिसॉ आणि घसरगुंडी हे लाकडाचे चार प्रकार लागले . त्याच्या सभोवती छान पैकी बगीचा केला गेला होता. शाळेच्या इतर तिन्ही भागांमध्ये साधारण सात आठ फूट जागा सोडून निगडी च्...

मी आणि संगीत...

Image
तसा माझा आणि संगीताचा संबंध अगदी लहानपणा पासून. गावामध्ये झोपाळ्यावर रोज संध्याकाळी शुभम करोति, रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि त्यानंतर काही श्लोक झाल्यावर आमच्या आत्या आम्ही सर्व भावंड आणि  शेजारची आलेली काही मुले असे सर्व जुनी गाणी रोज म्हणत मोठे झालो. त्यावेळी आशा भोसले ,लता मंगेशकर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपुर यांची भावगीते जास्ती करून आमच्यापेक्षा मोठी असलेल्या ताई आणि आत्या या म्हणत असत. नंतर आम्ही आमच्या शाळेतील कविता मोठ्याने म्हणायचो. हे रोजचे कार्यक्रम. रामनवमीला वगैरे गावातील देवळामध्ये भजन कीर्तन चालायचे. तसे काही संगीत नाटके गावात कधीतरी येणारे नाटक कंपनी सादर करायचे ,ते पाहायला आणि ऐकायला मात्र आम्ही जात असोत. नाटकातील एखादे संगीत कलाकार पुण्या मुंबईवरून येत असत. संगीत सौभद्र, मंदार माला,स्वयंवर अशी आणि इतर नाटके ते करत. भार्गवराम आचरेकर हे एक चांगले आठवतात! बाकी शाळेतील शारदोत्सवा मध्ये आम्ही लहान मुलांनी केलेली, नाचलेली गाणी आणि काही मुलींचीच नृत्य आणि गाणी होत असत. गावातील हौशी तबला आणि पेटी वादक अशा कार्यक्रमाला साथ देत. विठ्ठल मंदिरात होणाऱ्या नाटकामध्य...

हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था कशी असते..

Image
हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था ..शिप वरती केलेल्या पंधरा वर्षा मधील कामे आणि वादळी संकटे ,टेन्शन च्या परिणामा मुळे कीवा नंतर दोन वर्ष शिप रिपेरिंग वर्क शॉप मध्ये आलेले टेन्शन आणि शरीराचे झालेले हाल, म्हणजे कोणत्याही वेळी,दिवस आणि रात्री अवेळी किती वेळ दग दग आणि कमी झालेली झोप यामुळे पण माझा वयाच्या 38 वर्षी डावा हात दुखायला सुरुवात झाली. पहिले दोन-तीन महिने विशेष लक्ष दिले गेले नाही.नंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना स्पॉंडि लायसिस वाटले. त्यावर त्यांनी मानेला बांधायचा पट्टा दिला. तो दोन-तीन महिने वापरला, हात दुखत होताच.नंतर एक दोन महिन्या नंतर डोळे ओढल्या सारखे वाटायला लागले. डोळ्याला नंबर आहे म्हणून चष्मा दिला पण पॉइंट 0.25 होता.तरीही हात दुखत च होता. थोडा थोडा दम लागत होता. नोकरी चालूच होती शिप रिपेरिंग काम चालू होतं. शिव वरती वर खाली ड्रायडॉक मध्ये अशी खूप दगदग व्हायची.एक दिवस ड्रायडॉक मध्ये शिप असताना  खूपच दम लागू लागला. चार पावलं चाललं पण कठीण होतं होत, सोबतच्या एका कामगाराला घेऊन घड्याळ गोदी ते मशिद बंदर कसा बसा थांबत थांबत गेलो. आणि तासा भरात रेल्व...

वेळ काही पूरत नाही....

आयुष्य वाढते वेळ काही पुरत नाही,                                राहिलेल्या कामांची लिस्ट काही संपत होत नाही !                                            बालपणीच्या, तरुणपणीच्या, नोकरी करत असतानाच्या, आठवणी लिहायला वेळ काही पुरत नाही!                             मित्र,मैत्रिणीचे लहानपणीचे चेहरे आठवतात,                    प्रत्यक्ष भेटीत ओळखता येत नाही!                                                           नव्या जगात नव्या युगात मोबाईल वरील खंडीभर ॲप मुळे,                    ...

मोबाईल पेंटिंग एक छंद...

Image
तशी मला लहानपणापासूनच ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड होती. साधारण तिसरी,चौथीचा असताना शाळेमध्ये दसऱ्याला पाटी वरती आम्ही सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा करायचो .बहुतेक सर्वजण एक एक आकडा काढून त्याचं रांगोळी सारखं चित्र काढायचे. मी मात्र सरस्वती देवीचा फोटो काढायचा प्रयत्न करायचो आणि ते बऱ्यापैकी चांगलं व्हायचं. हळूहळू पुढे माझे काही मित्र पण माझ्याकडून त्यांच्या पाटी वर चित्र काढून घेत. लहानपणी रफ पेपरवर मी खूप रेखाचित्र काढायचो .त्यावेळी आमच्या बाजूला एक गोखले मास्तर म्हणून राहत होते. ते मला कधी कधी थोड गाईड करत. आठवीमध्ये गेल्यानंतर मला इंग्लिश शाळेमध्ये चित्रकला विषय होता ते बहुदा कोसुंबकर किंवा मेहंदळे गुरुजी शिकवायचे. त्यांना माझी चित्रे  खूप आवडायची. त्यांनी  मला ड्रॉइंग च्या पहिल्या परीक्षेला बसवले . आणि पुढील वर्षी लगेच दुसऱ्या परीक्षेला बसवले . मी परीक्षा पण पास झालो. महाराष्ट्र शासनाची परीक्षा असायची. शाळेमध्ये असताना देखील क्लास चालू असताना  वहीच्या मागील पानांवर मी असंच रेखाटन करायचो. असा कधीच दिवस गेला नाही की मी क...

एक अस्मरणीय प्रवास...

Image
एक अविस्मरणीय प्रवास......डिसेंबर १९८१चा तिसरा आठवडा होता.खूप मोठ्या वादळाला तोंड दिल्यानंतर आमची शिप सुखरूपपणे इटलीमधील ट्रीएस्ट या बंदरावर आल्यावर तिथून मी त्याच दिवशी संध्याकाळी सुटी वरती येण्यासाठी शिप वरून उतरलो. माझं Alitalia चे रोम मार्गे मुंबईच तिकीट दुसऱ्या दिवशी सकाळच होतं पण अचानक  खूप बर्फ पडायला सुरुवात झाली आणि एअर पोर्ट वर वर बर्फ जमा झाल्याने सर्व विमाने रद्द झाली. दोन दिवस मी हॉटेल मध्येच अडकून राहिलो. सकाळच्या वेळी थोडे शहरात फिरून येत असे पण  बर्फ असल्यामुळे जास्त काही फिरायला जमायचं नाही. चौथ्या दिवशी सकाळी माझं फ्लाईट रोमला जायला निघाल. रोम हून माझं डायरेक्ट फ्लाईट Alitalia चे मुंबईच होतं पण दोन दिवस उशीर झाल्यामुळे मला जे विमान मिळेल त्याप्रमाणे  जायला लागत होते. दहा तास मला रोम एअरपोर्ट वरती थांबायला लागलं मुंबईच्या साठी.रोम एअरपोर्ट वर  सर्वात जास्त म्हणजे दहा-बारा तास बसून होतो. आणि या सर्व दहा-बारा तासात माझ्याकडे असलेले भरपूर सामान प्रत्येक वेळी बाथरूम मध्ये जाताना मला बरोबर घेऊन जायला लागत होत कारण मी एकटा होतो अर्थात मी एक पोर...