१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

आमची शाळा 175 वर्षाची झाली म्हणून आपण श्री गणेशा जिथून शिकलो त्याबद्दल काही लिहाव असे वाटले म्हणून हा लेख लिहीत आहे.आत्ताची मालगुंड ची जीवन शिक्षण शाळा ही पूर्वी पूर्ण प्राथमिक शाळा मालगुंड या नावाने होती, शाळेची स्थापना १९५१ साली झाली. पाच जून रोजी या शाळेला १७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या शाळेबद्दल हा लेख मी लिहीत आहे. १९५५ साली मी या शाळेत पहिली मध्ये दाखल झालो. म्हणजे सुमारे ७५ वर्षापूर्वी. गणपतीपुळे खाडी पार करून मालगुंड मध्ये शिरल्यानंतर पुढे काही अंतरावरच डाव्या बाजूला आमची ही जीवन शिक्षण शाळा आहे. त्यावेळी इंग्रजीची C आकारामध्ये दगडी बांधकामाची मजबूत होती आणि आताही अशीच आहे. जमिनी शेणाने सारवलेल्या  असत, प्रत्येक विद्यार्थी आपली बैठक गोणपाटाची घेऊन येत असत. शाळेच्या पुढील भागामध्ये एक सुंदर बाग होती. आम्ही शाळेत जायला लागल्या नंतर काही वर्षांनी त्या बागे मध्ये झोपाळा, गोलाकार फिरणारे चक्र, सिसॉ आणि घसरगुंडी हे लाकडाचे चार प्रकार लागले . त्याच्या सभोवती छान पैकी बगीचा केला गेला होता. शाळेच्या इतर तिन्ही भागांमध्ये साधारण सात आठ फूट जागा सोडून निगडी च्या झाडाची चारी बाजूला कंपाऊंड केलेले होते. त्या कंपाउंड मधीलच झाडाची फांदी घेऊन आम्हीच आणलेल्या फांदीने आम्हाला काही चुकी केली तर शिक्षा व्हायची शाळेतील शिक्षकांकडून. तीन-चार पायऱ्या उतरून खाली उतरल्यावर शाळेच्या बागे मधून आम्ही शाळेमध्ये दाखल व्हायचो. डाव्या बाजूला सातवी चा वर्ग त्यानंतर हेड मास्तरांची  खोली. उजव्या बाजूला सहावी चा वर्ग. त्यानंतर मध्ये मल्ल खांब आणि डाव्या बाजूला प्रथम चौथी आणि नंतर दरवाज्याच्या नंतर तिसरी चा वर्ग असायचा. पहिली आणि दुसरीचा वर्ग पाठीमागील  उजवी आणि डाव्या पडवी मध्ये असायचा. शाळेमध्ये कुठेही पंखा ट्यूब लाईट हे काही नव्हते. सकाळी शाळेत गेल्या गेल्या प्रथम बागेची साफसफाई, वर्गांची साफसफाई मुलं स्वतः आपल्या हाताने करत होती. त्यानंतर शाळेची प्रार्थना मधील भागात व्हायची. हेड मास्तरांच्या उजव्या हाताच्या बाजूला शाळेची गोल आकाराची पितळेची सारखी घंटा होती आणि त्याला वाजवण्यासाठी एक लाकडाचा हातोडा होता तो तिथेच टांगला जायचा. शाळा भरली आणि शाळा सुटली की त्या घंटे चे ठोके  हेड मास्तरांच्या ऑफिस मधील घड्याळ बघून कोणीतरी विद्यार्थी देत असे.त्याच्या समोरच एक मोठा बोर्ड होता त्यावरती रोजचं सुभाषित लिहिलं जायचं. त्याच्यावर तारीख,  म्हणजे दिनांक उजव्या हाताला  लिहिलेला असायचा. आम्हाला त्यावेळी युनिफॉर्म वगैरे काही नव्हतं. शाळेच्या मागे काही अंतरावर आमच्या शाळेची एक छोटी इमारत पण होती. त्यामध्ये सुतार काम हे पाचवी ते सातवी शिकवलं जायचं. काही वर्ग पण त्याच्यामध्ये असत. त्याच्या बाजूला मोठं ग्राउंड होतं. आणि एका बाजूला संडास बाथरूम. ते टीचर आणि मुलीं साठीच असावं कारण आम्ही वापरलेला आठवत नाही. शाळेतील सर्व शिक्षक कडक  पण प्रेमळ होते. काही आठवत असलेल्या शिक्षकांची नावे अशी. श्री.जोशी गुरुजी, श्री तेरेदेसाई हे हेडमास्तर होते. श्री.कुलकर्णी,श्री.बीवलकर,कारूळकर बाई, वेंगुर्लेकर बाई, श्री.कुलकर्णी, ढापरे बाई, निवेंडीकर गुरुजी, आणि कोसुमबकर गुरुजी जे नंतर आम्हाला माध्यमिक शाळेमध्ये पण मराठी आणि ड्रॉइंग शिकवायला होते. कुलकर्णी सर आम्हाला पाचवी ते आठवी सुतार काम शिकवायचे. शाळेमध्ये रवी, फट फटे, कप आणि बशीचा स्टॅन्ड असे काही आम्ही बनवायचं. म्हणजे एकत्रित. त्यामुळे लहानपणा पासून  करवत,रंधा,कानस ,स्क्रू ड्रायव्हर वगैरे अवजारांची माहिती आम्हाला झाली होती आणि ती पुढे आम्हाला खूप उपयोगात आली. शाळेच्या मागील मैदानात आम्ही खोखो हू तू तू... हल्लीची कबड्डी, विटी दांडू असे खेळ खेळायचो. अधून मधून मल खांब वरती देखील कसरत करायला खूप आवडायचे. सुंदर तुकतुकीत मल खांब होता. दसऱ्याच्या दिवशी शाळेमध्ये संस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यामध्ये गोफ विणणे, नाट्यछटा, मुला मुलींचे नृत्य हे कार्यक्रम असायचे आणि कार्यक्रमाचे तबलावादन आणि पेटी श्री. मेहेंदळे सर आणि श्री.कोसुंबकर सर हेच करायचे. सातवी ची परीक्षा बोर्ड घ्यायची आणि ते सर्टिफिकेट घेऊन आम्ही बळीराम परकर विद्यालयात आठवी मध्ये दाखल व्हायचो. प्राथमिक शाळेत घेतलेल्या शिक्षणा मुळेच आम्ही पुढे बळीराम परकर विद्यालयात घेतलेल्या शिक्षणामुळे आयुष्यात खूप मोठा उपयोग झाला. आमच्या या शाळेबद्दल लिहिण्या सारखं खूप आहे किती जुन्या आठवणी लिहिल्या तरी त्या कमीच आहेत! पहिल्या शाळेचे महत्त्व कोणत्याही विद्यार्थी कधीही विसरू शकत नाही आयुष्याची पुढील वाटचाल त्या शाळेत मिळालेल्या शिक्षणाची पुढील जीवनात खूप उपयोगी पडते.आजही मालगुंडला  गेल्यानंतर पहिली नजर आमच्या प्राथमिक शाळेकडे जाते!🌹🙏🙏.... राम केळकर, मरीन इंजिनियर.बावधन.पुणे. मोबाईल नंबर.८९७५२३४२१४

Popular posts from this blog

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...