जीवन सुंदर आहे!


जीवन सुंदर आहे! आनंदी आहे!!नक्कीच, जीवन सुंदर आहे!
जीवन हे एक अद्भुत प्रवास आहे. या प्रवासात आनंद, दुःख, यश, अपयश, प्रेम,  असे अनेक रंग असतात. या रंगांची सांगड घालूनच आपले जीवन सुंदर बनते. जर तसं वय वाढत I 8ouhkk(8जाते तसे तसे आपल्याला खूप अनुभव अनुभवायला मिळतात. प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. मी बोटी वरती मरीन इंजिनियर म्हणून नोकरी केली तिथेच साहस म्हणजे काय हा अनुभव आला. वेगवेगळ्या प्रकारची वादळे, अपघात, हे अनुभवत असताना देखील समुद्र, आकाश, चंद्र, सूर्य ,तारे क्वचित तूटणाऱ्या तारका यांचे विलोभनीय वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य पण मनाला आनंद देऊन जायचे. सूर्योदय सूर्यास्त यांचे आकाशा मध्ये थोड्या थोड्या अंतराने बदलणारे रंग मनाला आनंदित करून जात असत. वादळात हेलकावत असणाऱ्या बोटीवर हमखास सर्व आप्त आणि मित्रांची आठवण होते. कारण पुढे काय होणारे हे आपल्याला माहिती नसते. सर्व आपापल्या देवावर विश्वास ठेवून असतात. त्याला साहस साथ देते!घाबरून न जाता संकटाशी चार हात करायला धीर देतात. बोटीचा प्रवास चालू असताना ड्युटी शिवाय इतर 16 तास प्रत्येक जण आपले छंद जपत असतात. काहीना गाण्याची आवड असते, काहीना वाद्य वाजवण्याची, काहींना वाचनाची तशी मला चित्र काढण्याची आणि पेंटिंग करायचा छंद मी जोपासला. मला खूप जण विचारायचे तुझी ड्युटी झाल्यावर तू वेळ कसा घालवतोस? मी सांगायचो मला वेळ पुरत नाही . काहीतरी नवीन आयडिया डोक्यात येतात आणि त्यावर निरनिराळ्या प्रकारची चित्रे काढायचं आणि  रंगवायचं काम करायचो . आपल्या जवळचे लोक आपलं कौतुक करून आपल्याला आणखीन काहीतरी करायची प्रेरणा देतात. समुद्र शांत असताना संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी आकाशाकडे आणि समुद्राकडे पाहत असताना मला खूप प्रसन्न वाटायचं आणि मग छान छान कल्पना डोक्यामध्ये यायच्या. समुद्रा वरची शुद्ध  हवा आरोग्याला लाभदायक असल्याने शिप वरील नोकरीत कधी आजार पण आले नाही. पंधरा वर्षे बोटीवर नोकरी केल्यानंतर मी किनाऱ्या वरती  नोकरी घेतली. वर्क शॉप मधील नोकरी म्हणजे थोडी त्रास दायक होती. पण त्यात मला खूप काही शिकायला मिळालं. बोटी ट्रायडॉक  करत असताना खूप काही नवीन नवीन शिकायला मिळालं. त्यावेळी कॉम्प्युटर नवीन होता .त्यामध्ये बोटीची ड्रॉईंग काढायला आणि इतर गोष्टींमध्ये मला खूप इंटरेस्ट निर्माण झाल्याने कधी कधी ऑफिसमध्ये मी जास्त वेळ बसत असे. त्यामुळे मला घरी यायला उशीर व्हायचा. नवीन काही तरी शिकायला मीळायचं याचा आनंद व्हायचा.मला माझ्या चित्रकलेच्या आवडीमुळे या सर्व नोकरी मध्ये खूप फायदा आणि आनंद झाला. आता या माझ्या 76 व्या वर्षी मी मोबाईलवर निरनिराळ्या प्रकारची चित्रे काढून ती रंगवतो आणि माझ्या मित्र आणि नातेवाईक यांना पाठवतो. त्यांच्याकडून आलेली कौतुकाची थाप मला खूप आनंद देते. गेल्या वर्षी मी ' साद सागराची' हे  माझ्या सागरी जीवनावर असलेले पुस्तक ई साहित्य मध्ये प्रसारित केले. खूप जणांकडून मला त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या. आपण चांगलं काही लिहू शकतो आणि लोकांना ते आवडतं यात देखील आनंद मिळाला. कौतुक कोणाला आवडत नाही ! सकाळी तासभर योगासने,प्राणायाम,आणि इतर व्यायाम, संध्याकाळी तासभर चालणे आणि इतर वेळी मोबाईल वरती निरनिराळी ॲप वापरायचा प्रयत्न करून कधी चित्रे कधी लेखन तर कधी एआय वापरायचा प्रयत्न करतो. प्रत्येक परिस्थितीत चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो. घरातील कामात थोडीफार मदत करतो . लोक म्हणतात वृद्धांचा वेळ जात नाही पण मला वेळ पुरत नाही ! मी नेहमी म्हणतो जीवन सुंदर आहे ! चांगल्या गोष्टीच पहा, चांगलाच विचार करा, आपले जुने छंद जोपासा ! आपोआप जीवन सुखी राहील आणि दुसऱ्याला पण सुखी कराल!!
                                        राम केळकर, बावधन पुणे.मोब.नो.8975234214

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...