एक अस्मरणीय प्रवास...

एक अविस्मरणीय प्रवास......डिसेंबर १९८१चा तिसरा आठवडा होता.खूप मोठ्या वादळाला तोंड दिल्यानंतर आमची शिप सुखरूपपणे इटलीमधील ट्रीएस्ट या बंदरावर आल्यावर तिथून मी त्याच दिवशी संध्याकाळी सुटी वरती येण्यासाठी शिप वरून उतरलो. माझं Alitalia चे रोम मार्गे मुंबईच तिकीट दुसऱ्या दिवशी सकाळच होतं पण अचानक  खूप बर्फ पडायला सुरुवात झाली आणि एअर पोर्ट वर वर बर्फ जमा झाल्याने सर्व विमाने रद्द झाली. दोन दिवस मी हॉटेल मध्येच अडकून राहिलो. सकाळच्या वेळी थोडे शहरात फिरून येत असे पण  बर्फ असल्यामुळे जास्त काही फिरायला जमायचं नाही. चौथ्या दिवशी सकाळी माझं फ्लाईट रोमला जायला निघाल. रोम हून माझं डायरेक्ट फ्लाईट Alitalia चे मुंबईच होतं पण दोन दिवस उशीर झाल्यामुळे मला जे विमान मिळेल त्याप्रमाणे  जायला लागत होते. दहा तास मला रोम एअरपोर्ट वरती थांबायला लागलं मुंबईच्या साठी.रोम एअरपोर्ट वर  सर्वात जास्त म्हणजे दहा-बारा तास बसून होतो. आणि या सर्व दहा-बारा तासात माझ्याकडे असलेले भरपूर सामान प्रत्येक वेळी बाथरूम मध्ये जाताना मला बरोबर घेऊन जायला लागत होत कारण मी एकटा होतो अर्थात मी एक पोर्टेबल ट्रॉली घेऊन ठेवली होती.  इटलीमधील रोम एअरपोर्ट तसं भीती दायकच तेथे चोऱ्या मार्‍या खूप होत असत. शेवटी दहा तासाने मला Alitalia चे मुंबईला जाणार विमान मिळाले. ते विमान धारान या सौदी अरेबियातील विमान तळा वरून पुढे जाणार होत. धारान ला लँडिंग झाल्यानंतर तिथून काही वेळाने आम्ही मुंबईसाठी निघणार होतो. पण विमानाने टेक ऑफ घ्यायच्या आधीच विमानातून इंधनाची गळती  सुरु झाल्यामुळे उड्डाण रद्द झाले. आम्हाला विमानातून उतरवण्यात आले आमच्या जवळच्या हॅन्डबॅग सकट! त्याच्यातील काही द्रवयुक्त बाटल्या सौदी अरेबियातील कायद्याप्रमाणे आम्हाला कॅप्टनच्या हवाली करायला लागल्या .बाकीचे सर्व सामान पुढे बुक केलेलं होतं त्याचा प्रश्न नव्हता. आम्हाला पुढल्या विमानात आमचं सामान परत मिळणार होत जे कॅप्टनच्या हवाली केलं होतं. पुढचं कनेक्टिंग विमान कधी मिळेल या आतुरतेने आम्ही खूप पॅसेंजर एअरपोर्टवर सहा सात तास बसून होतो. ख्रिसमस चा सिझन असल्यामुळे विमानांना खूप गर्दी होती. कधी एकदा मुंबईला पोहोचतो असं झालं होतं . हा दुसरा दिवस होता. संध्याकाळी सहा वाजता बेहरिन ला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेज विमानात जागा मिळाली .कारण तेथून पुढे दुबई आणि दुबईहून कोलंबो मार्गे जाणार विमान मला मिळणार होतं. बेहरीन ला जाणाऱ्या विमानात बसल्यावर आम्ही आमच्या कॅप्टनने काढून घेतलेल्या पिशव्याच्या प्रतीक्षेत होतो पण त्या काही मिळाल्या नाहीत. बेहरीनला पण तीन-चार तास बसायला लागले. धारान ते बेहरीन हा प्रवास म्हणजे फ्लाईंग टाईम दहा मिनिटेच होता. बेहरीन ला उतरल्यानंतर साधारणपणे चार तासाने दुबईचे विमान मिळाले. त्या दिवशी ती रात्र दुबई एअरपोर्ट वरतीच काढायला लागली .कारण पुढे कोलंबोला जाणार विमान लुफ्तांझा चे सकाळी पाच वाजता होते . धारांनला माझं तेथील कॅप्टनला दिलेलं द्रवरूप सामान आम्हाला  धारान ला न मिळाल्या मुळे परत तसेच सामान दुबईला नवीन खरेदी केले. आणी सकाळी श्रीलंकेला जाणाऱ्या विमानात बसलो. त्या अगोदर दुबई येथून घरी टेलिग्राम करून मी उद्या संध्याकाळी मुंबईत येईन असे घरी कळवले.त्यावेळी मोठी रक्कम घेऊन एअरपोर्ट वरती यावी अशी तार केली. कारण माझ्याकडे इंडियन करन्सी नव्हती तर कस्टम ड्युटी लागली तर भरण्यासाठी.दुपारी अकरा साडेअकरा वाजता कोलंबो विमान तळावर विमान उतरले. माझ मुंबईच श्रीलंका एअरवेजचे विमान संध्याकाळी सहा वाजता होतं. ते पाच सहा एअरपोर्ट वरती बसून काढले. हा तिसरा दिवस होता. या सर्व प्रवासात सर्व प्रातर्विधी  विमानात किंवा विमानतळावरच होत होते. तीन दिवसात अंघोळ झालेली नव्हती. शेवटी संध्याकाळी तिसऱ्या दिवशी मी साडेसातच्या सुमारास मुंबई एअरपोर्ट वरती उतरलो. एकंदर तीन दिवस विमान आणि विमानतळावर काढायला लागले.  मुंबई विमानतळावर कोणी आलेले नव्हते. परंतु सुदैवाने कष्टमने मला काही ड्युटी न लावतात सोडल्याने मी कस्टम मधून लगेच क्लिअर झालो. माझ्याकडे पाच रुपयाची नोट होती. उतरल्यावर एका पोलीस शिपाया कडून पाच रुपये सुट्टे घेतले म्हणजे आठ आण्याची काही नाणी. त्यावेळी आठ पाण्याचं कॉइन टाकून फोन करता यायचा म्हणून मी माझ्या जवळच असलेल्या विलेपार्ले च्या मावस भावाला फोन करून त्याला गाडी घेऊन यायला सांगितले.सर्वसामान त्याच्या गाडीतून मावशीकडे ठेवून मी रेल्वेने ठाण्याला घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्ट मन ने बेल दाबली आणि मी दुबई एअरपोर्ट वरून केलेली तार मी स्वतः घेतली. असा केवळ दहा-बारा तासाचा प्रवास मला तीन दिवस करायला लागला. हा प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही....राम केळकर बावधन, पुणे.

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...