१९५० ते १९६६ या काळातील आमचे मनोरंजन करणारी नाटके आणि खेळे.

मला आठवणी असलेली कोकणातील आमच्या लहानपणी काही मनोरंजन करणारे दोन प्रकार एक नाटक आणि दुसरे खेळे..... गावातील विठोबा मंदिर मधील ब्राह्मणांचे, भंडारवाड्या मधील भंडारी समाजाचे , आणि रामेश्वर देवळातील मराठे समाजाचे लोक  वर्षातून एकदा निरनिराळी नाटके गावातील व मुंबईत राहणारी नाट्य प्रेमी कलाकार गावात येऊन गावातील लोकांना बरोबर घेऊन काही दिवस आधी तालमी करत आणि छान नाटक सादर करत. सर्व समाजाची नाटके सर्व समाजातील लोक उत्साहाने जेवण लवकर आठपून  रात्रीच्या वेळी बघत असत. अगदी लहान मुले ते वयोवृद्ध! काही वेळेला नाटके रात्री उशिरापर्यंत म्हणजे दोन-तीन वाजेपर्यंत पण चालत. सर्व लाकडाचे आणि कापडाचे सेट स्वतःच बनवून स्वतः त्याचे सेटिंग करायचे. त्यातील पेंटिंग पण छान असायचे. त्यावेळी लाईट नव्हते त्यामुळे गावातील सर्वजण आपल्याकडे ल पेट्रो मॅक्स नाटकाच्या कार्यक्रमासाठी आनंदाने देत असत. त्यावेळी पडदे मात्र कुठून आणत माहिती नाही .पण ओढायचे पडदे असायचे. स्पीकर ची सोय नव्हती पण कलाकारांचे आवाज खणखणीत असल्यामुळे सर्वांना नाटकातील संवाद व्यवस्थित ऐकू यायचे. गंमत गंमत म्हणजे कधी कधी पाठीमागून प्राँटींग करणारा माणूस नवा असेल तर त्याचा आवाजही ऐकू यायचा पुढील ओळी मध्ये बसलेल्या लोकांना. एप्रिल मे मध्ये बाहेरून गावातून कोणती तरी नाटक कंपनी भावे स्कूलमध्ये उतरायचे आणि तेथील पटांगणा मध्ये रात्रीच्या वेळी नि र निराळी नाटके सादर करीत असत. संगीत नाटकासाठी एखादा मोठा गायक नट काही वेळेला मुद्दाम येत असे. बाहेरचे काही कलाकार म्हणजे भार्गवराम आचरेकर, यांचे नाव माझ्या लक्षात आहे. तबला आणि पाय पेटी वाजवण्यासाठी त्या कंपनीचे च कलाकार असत. विठोबा मंदिर मधील नाटकांना मात्र आमच्या शाळेतील श्रीयुत मेंहदळे सर, श्रीयुत शंकर केळकर, श्रीयुत कोसुमकर मास्तर, श्रीयुत शिवराम काणे हे तबला आणि पेटी वाजवत असत. शिवराम काणे पायपेटी अतिशय उत्कृष्ट वाजवत. नेहमी बघायला मिळणारे प्रसिद्ध कलाकार म्हणजे श्रीयुत परसू (परशुराम)केळकर, श्री. जयंत पाटील, आणि आमचा परममित्र श्रीयुत जयेंद्र सुर्वे. हे माझ्या आठवणीतील काही प्रसिद्ध कलाकार.                       आजूबाजूच्या गावामध्ये म्हणजे वरवडे, रीळ येथे देखील खूप लोक जात मी स्वतः पण गेलो आहे. सर्व लोक छान नाटकं करत .                               दशावतार.. खेळे हा एक मनातील मनोरंजनाचा भाग होता. हे कलाकार घरोघरी जाऊन पारंपारिक खेळे हा  कार्यक्रम सादर करत. यातील शंकासुर हा आम्हा लहान मुलांना घाबरवत असे. खूप गमती जमती करत. त्याच्यात पाच गवळणी आणि एक मावशी हे पात्र पण एक गमतीदार असायचे. गवळणी आणि मावशी या नऊ वारी साडी मध्ये असायच्या. पाठीमागे असलेले कलाकार मोठा पाय घोळ झगा ,गळ्यात खूप माळा, डोक्याला फेटे आणि स्वतः टाळ कीवा झांजा वाजवत असत,आणि हे वाजवताना डोलत पण असत डावी उजवीकडे. त्यातील एक दोन गाणी अशी असत.. आल्या आल्या पाच गवळणी पाच रंगाच्या शृंगार करुनी.... दुसरं गाणं.... सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर.... आता एवढं पुरेसं पुढल्या वेळेला आणखीन कशावर तरी.... राम केळकर, पुणे बावधन.

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...