सूर्य तापला..
भर दुपारी बारा वाजता होत आहे आग l पातळ होतोय मेंदू पायांची होते आग ll घामाच्या धारांनी भिजून झालो चिंब l घामाच्या मुळे कपडे होतात तंगll अंगाची होते लाही लाही l झूळके तुझी वाट मी पाही ll जंगल ,इमारती, रस्ते आणि कुंपण सर्वच झाली तप्त l ओसाड झाले डोंगर झाडे झाली ध्वस्त ll रुक्ष झाले डोंगर धरणे झाली शुष्क l सरकारी अधिकारी आणि मंत्री मात्र मस्त ll. झाडे कापली डोंगर तोडले l बंगले इमारतीचे मजले वाढले ll होती फूटपाथ वरती झाडे बहरलेली l आता मोमोज आणि वडा साठी होती गर्दी जमलीll. वेधशाळा अंदाज बांधतात भरपूर पाऊस पडेल असे म्हणतात l वेधशाळेचे अंदाज कधी बरोबर असतात ?ll ते पण राजकारण सारखे फेकू असतात l माणसे मात्र आकाशाकडे आशाळ भूतपणे पाहतात ll आता कोणावर विश्वास ठेवावा कुणाच्या तापा पासून कोण सावली देणार l देवा तूच काही कर आणि मंत्री अधिकाऱ्यान पासून देशाला वाचावं ll. पाऊस पडू दे थंडी पडू दे हिवाळाही येऊन दे l. आणि तुझ्या कृपेमुळे माणसाला आणि जनावराला आनंदात राहू दे ll राम केळकर, बावधन पुणे