माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1
[9/15, 06:16] Rk Gopal Aawati: संपूर्ण पुस्तक चाळले. सर्वांग परिपूर्ण आणि फार रोचक झाले आहे. प्रकरणांची रचना, आशय, फोटोंची पेरणी.....सर्व एकदम मस्त.
आणि बघता बघता भरपूर मोठे झाले की. मरीन करीअर करणाऱ्या तरुणांसाठी संदर्भ म्हणून भरपूर काही आहे. कठीण प्रसंग...वगेरे.
पती पत्नी मधले हळवे नातेही छान डोकावत राहते.
एकंदर मस्त. चिकाटीने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
मृणाल वहिनींचे ही 💐🌺🙏👍
[9/15, 07:37] Rk Gopal Aawati: सौ. वहिनींनी ठाण्यात घेतलेल्या कष्टाची कल्पना न्हवती. त्यांना सलाम.
मुखपृष्ठावर जहाज, समुद्र असायला हवे होते.
एकूण तुम्ही जगलेल्या एका संघर्षमय तितक्याच छान जीवनाची ही कहाणी आहे.
*थ्री चीअरस* 👍. तसं पहाता सामान्य आणि असामान्य असं काही नसतं. पण सहसा अप्रसिद्ध व्यक्तींना सामान्य म्हटलं जातं. म्हणून ती असामान्य नसतातच असं नाही. ही जी दोन पुस्तकं आज पाठवत आहोत ती या असामान्य पण अप्रसिद्ध व्यक्तींची आहेत. पहिले आहे श्री राम केळकर या दर्यावर्दीचे. बोटीवर आयुष्य घालवलेले श्री राम केळकर पन्नास देशांत फ़िरले, अनेक जीवघेणी संकटे, कितीतरी आनंदाचे क्षण, अनेक विचित्र अनुभव यांनी त्यांचे जीवन असामान्य कसे बनले हे त्यांच्याच शब्दांत त्यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव आहे, *साद सागराची*.
दुसरे पुस्तक आहे सौ. जयश्री पटवर्धन यानी लिहिलेले- *असामान्य*. गांवोगांवी पसरलेल्या अनेक रत्नांची त्यांच्या असामान्य कार्याची ओळख त्यांनी करून दिली आहे. त्यात पुस्तकांचे हॉटेल च्वालवणार्या जोंधळे आजी, अनाथ व गरीब मुलांचे होस्टेल चालवणारे, कर्नल मोघे, इतरांच्या दोन टक्के किंमतीत इन्क्युबेटर बनवणारे अरुण करकरे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत मेडल्स मिळवणारा गतीमंद ओंकार, भिकार्यांचे डॉक्टर अभिजीत सोनावणे अशा एक से एक असामान्य लोकांची ओळख या पुस्तकात होईल.
ही दोन्हीही पुस्तके Must Read आहेत. वाचून आपले अभिप्राय लेखकांना कळवावेत ही विनंती. पुस्तके विनामूल्य आहेत. पण आपला अभिप्राय अमूल्य असेल.
अशाच पुस्तकांसाठी भेट द्या- www.esahity.com
आपला
सुनीळ सामंत ... खालील फोन वरून प्रतिक्रिया आल्या.रत्नागिरीचे कात्रे, बंगलोर चे काळे श्री देशपांडे मिरज यांचे....खूपच वेगळे अनुभव व वाचताना प्रत्यक्ष अनुभव आपल्या समोर येत आहेत असे व रोमांच उभे राहतात व नवीन विश्व उभे राहते , खूप मस्त ! तुमचे अनुभव खूप काही शिकवून जातात व वाचून आम्हास प्रत्यक्ष अनुभवल्या सारखा डोळ्यासमोर क्षण उभे राहतात, धन्यवाद, नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन 💐💐🙏
किशोर देशपांडे, मिरज .................... Ram is the BOOK PRINTED? IF SO CAN I BUY IT IN SHOP OR ORDER IT FROM SOME WHERE??
LET ME KNOW . I WANT TO HAVE IT fir my library.
Shrikant Kaka.Mumbai... "साद सागराची" पुस्तक e साहित्य मार्फत वाचनाची संधी मिळाली... खुप छान वाटले, तुमचे रोमांचक अनुभव लेखन, तुमचा लहानणापासूनच काळ तर खूपच छान वर्णन केलात..खरच तुम्ही समण्यातले असामान्य व्यक्ती आहात...🙏🏻💐🙂 श्रीयुत प्रसाद जूवेकर.पनवेल नवी मुंबई. .. ................ मा.राम केळकर सर,नुकतेच तुमचे पुस्तक वाचले. अप्रतिम लिहिले आहे. वाचक त्यात खऱ्या अर्थाने गुंतून जातो, इतकं ते वाचनीय झालं आहे. प्रत्यक्ष तुम्ही स्वतः संवाद साधत आहात असा भास होतो.
अशा उत्कृष्ट लेखनाबद्दल मनापासून अभिनंदन! रेखाचित्रे आणि फोटो अतिशय बोलके आहेत.
मृणालताई यांनी केलेला पुस्तकाचा समारोप फार भावस्पर्शी आहे.
दोघांचे मनापासून खूप अभिनंदन!
सरोज सहस्त्रबुध्दे.
[9/23, 12:18] Dr.Saroj..Neil Sahasrabudhe Ebook साद सागराची: नमस्कार राम सर. माझं नाव नील सहस्त्रबुध्दे आहे. मी सरोज सहस्त्रबुध्दे यांचा मुलगा आहे. ती whattsapp फार वापरत नाही म्हणून तिने मला मेसेज करायला सांगितले. तुम्ही माझ्याकडे paintings पाठवल्यास आम्हाला बघायला खूप आवडतील.
[9/23, 12:22] Dr.Saroj..Neil Sahasrabudhe Ebook साद सागराची: तिची पण ई साहित्य कडे १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील एका पुस्तकात बोटीवरचा अनुभव कथन केला आहे. ते पुस्तक व त्याचा प्रोमो व्हिडिओ सोबत आहे. पुस्तकातील तो शेवटचा लेख आहे. बाकी लेख कदाचित मृणालताईंना वाचायला आवडतील असं आई म्हणाली. धन्यवाद. राम सर,
मोबाईलच्या कुंचल्यातून प्रगट झालेली तुमची एकेक कलाकृती म्हणजे फार मोठा आनंदाचा ठेवा आहे. निसर्गसौंदर्याने नटलेली आणि रंगांची मुक्त हस्ताने उधळण केलेली रंगचित्रे वेगळीच अनुभूती देऊन जातात! काय अवर्णनीय कला आहे तुमच्या हातात. अशीच सुंदर सुंदर चित्रे रंगवून आनंद वाटत रहा याच शुभ कामना!🌹🌷🪷🌻🙏👌. साद सागराची हे पुस्तक वाचल. बोटीवर कामकरणे अतिशय कष्टप्रद असते असे जुजबी माहित होते .
प्रथमच मुंबईत
येऊन स्वकष्टाने शिकून तुम्ही हा व्यवसाय निवडलात हे कौतुकास्पद आहे.
पूर्वी कारकुनी, शिक्षक असा पेशा निवडत
पुस्तक वाचून बोटींचे प्रकार समजले,रात्रंदिवस प्रचंड कष्ट करावे लागतात हे कळल
धाडस ही आवश्यक आहे , ही नोकरी करायला मनाची तयारी हवी
तुम्ही केलेला जगभराचा प्रवास वाचनीय आहे
पुस्तक अतिशयछान वाचनीय आहे
तुम्ही मन मोकळे पणाने आपला अनुभव वाचकांशी share केलात त्या मुळे वाचता आला
e-boot केल्या मुळे घर बसल्या वाचायला मिळाला
Thank you so much... श्रीमती सुषमा घाडगे.पुणे. ............... तुमचं पुस्तक वाचायला चालू केलं, जुन्या काळात गेल्या सारक वाटतंय, आत्ता मर्चंट Navy मध्ये तशी मजा नाहि, शोर leave pan नाही.. turn around खूप फास्ट आहे..capt.premanand Laskar सावंतवाडी. [9/24, 13:05] Subhada Ghatge. Art.: माझे वडील राजापुरचे , तेही तुमच्या प्रमाणे मुंबईत आले स्वतःच्या बळावर शिकले नोकरी केली भावंडनाही मुंबईत आणले
पहिला भाग वाचताना मला वाटले हे असे घरोघरी कोकणात घडत असावे
[9/24, 13:06] Subhada Ghatge. Art.: तुम्ही बोटीवर जाऊन जास्त मोठे धाडस केलेत. श्रीराम
आपण सारे जण लहानपणापासून समुद्राच्या लाटांचे संगीत ऐकतच वाढलो. पण त्या सागराची साद कानातून मनात व मनातून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे भाग्य एखाद्यालाच लाभते. आणि ते भाग्य आपण अत्यंत मेहनतीने व काका,मामा,, मामी, मावशी भावंड यांच्या सहवासात राहून सर्व प्रकारचे शिक्षण पूर्ण केले. शहरातील नातेवाईकांचा आधार फार महत्त्वाचा असतो.
आपले बालपण शिक्षण शाळा सारे परिचित आहेच. आपण केलेल्या वर्णनावरून थेट त्या काळात गेल्यासारखे वाटते. आणि मन बी.पी. विद्यालयाच्या बाकावर पोहोचले. तेथूनच प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होतात आणि प्रत्येक जण यशस्वी वाटचाल करतो. कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती थोडी कमी जास्त असेल पण जिव्हाळा तोच राहतो.
आता थोडं आपल्या सागरी साहसी जीवनाबद्दल. प्रत्येक अनुभव वाचून मन
चक्रावून जातं. कधी मुंबई गोवा प्रवासी बोटीवर तर कधी परदेश वारी. बहुतेक वेळ सागराच्या सानिध्यात राहिल्यावर जेव्हा आपण जमिनीवर उतरला असेल तर काय भावना असतील कल्पना न केलेली बरी. त्याच वेळेला पत्नी आणि मुलं यांच्यापासून दूर राहिल्याने होणारी तगमग. पण याचे सर्व श्रेय घर, प्रपंच,मुलांची शिक्षण व संगोपन,आजारपण सारे माऊलीने निभावले असेल तिच्या त्यागाला सलाम.
आपले निरनिराळ्या बोटीवरील निरनिराळे अनुभव वाचूनच थक्क व्हायला होतं. केलेली साहसे, भेटलेली लहान मोठी माणसे, मित्र परिवार त्यातून जोपासलेल्या कला व्यासंग हे सारे अंगातील ऊर्जा व बुद्धीचे लक्षण आहे. बोटीवरील सिनेमाचे शूटिंग बघणे हा तर भाग्याचा क्षण. आतोनात मेहनत,मनातील भीती, आहार विहारातील अनियमितता यातून बिचाऱ्या हृदयाला धक्का बसणे स्वाभाविक पण त्यातूनही निभावून जाणे हे आपल्या कुटुंबीयांचे भाग्य.
पुस्तकाचे पान न पान वाचताना एक एक थरारक प्रसंग नजरे समोर येतो. आपण जागोजागी ठेवलेले फोटो हा तर या पुस्तकाचा आत्मा आहे. इतकी मेहनत घेऊन केलेले सादरीकरण अप्रतिम आहे. आपले मित्रवर्य यांचे सहकार्य आपणास सतत लाभत आले आहे. सागर सफरीचे अनुभव वाचून थक्क व्हायला झालं त्याबद्दल अधिक लिहिणे आमच्या आवाक्या पलीकडे आहे.
फक्त एकच वाटते आपल्या ग्रुपमध्ये अनेक जण विविध क्षेत्रात अग्रेसर राहिले आहेत त्या सर्वांना आपले अनुभव शब्दबद्ध करण्यास हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल माझे छोटे मनोगत.अधिक लिहूच शकत नाही क्षमस्व.
आपणा उभयतांस व छोट्या परिवारास शुभेच्छा उत्तरोत्तर अशीच नवनवीन कलाकृती घडत राहो.
@ मंदा केळकर --सागवेकर. श्री. केळकर साहेब,
आपले " साद सागराची " हे पुस्तक पूर्ण वाचून झाले.
आपली लिहिण्याची शैली
फारच सुरेख आहे. चित्त थरारक प्रसंगांचे वर्णन आपण खूपच चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहेत.
ते प्रसंग वाचताना अगदी डोळ्यासमोर उभे राहतात.
आपली सरळ , सोपी व ओघवती लिहिण्याच्या पद्धतीमुळे पुस्तक वाचताना मन अगदी रमून जाते अणि पुस्तक वाचनासाठी घेतल्यानंतर खाली ठेवावे असे वाटतच
नाही.
अभिनंदन.
व्यंकटेश देशपांडे. ग्रँड कट्टा ,बावधन पुणे. GM..Garware ropes बाल मैत्रीण सुद्धा मंत्री तिने पुस्तकावर दिलेल्या काही कमेंट्स. Ram, tuz pustak hatatun thevavas vatat nahi. Khup changal varnan kelas. रोहन पांगले...सर मी तुमचं "साद सागराची" पुस्तक वाचाल मला खूप आवडल आणि छान वर्णन केलंय.
इ- साहित्य मधून मला ते पुस्तक वाचायला मिळालं मी रोज कळंबोली ते अंधेरी प्रवास करतो त्या वेळेत मी पुस्तकं वाचतो. सेलर लोकांची सॅलरी खूप असते असा माझ हि मत होत पण पुस्तक वाचून कळलं कि ते ज्याच्यातून जातात (त्रास सहन करावा लागतो / जीवघेणे प्रसंग येतात ) त्याच पुढे ते काहीच नाहीये हे समजलं. विशेष म्हणजे लेखक आपल्या कोकणातले असल्यामुळे भाषा लगेच जुळली माझाही बालपण कोकणातच गेलं ५ वि ते १० पर्यंत. चित्र कलेची आवड असताना देखील तुम्ही MARINE ENGINEERING केला आणि पुढचा प्रवासात ती कला उत्तम जोपासलीत. संपूर्ण पृथ्वी ची प्रदक्षिणा झाली तो क्षण, सगळ्यात भीतीदायक म्हणजे जीवघेणे प्रसंग त्यातुंन हि सुखरुप बाहेर आलात. खूप देशांतील तिथले वातावरणाचे अनुभव तेथील लोकांचे वर्णन खूप छान पद्धतीने लिहिलंय. त्यातील विशेष आवडलेलं म्हणजे जपान...रोहन पांगले. लांजा रत्नागिरी. Dr .sahastrbudhe,London UK. राम सर,
मोबाईलच्या कुंचल्यातून प्रगट झालेली तुमची एकेक कलाकृती म्हणजे फार मोठा आनंदाचा ठेवा आहे. निसर्गसौंदर्याने नटलेली आणि रंगांची मुक्त हस्ताने उधळण केलेली रंगचित्रे वेगळीच अनुभूती देऊन जातात! काय अवर्णनीय कला आहे तुमच्या हातात.तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून आम्हाला खूप आनंद वाटला. तुमची चित्रेच इतकी अप्रतिम आहेत की त्यामुळे आम्हालाही स्फूर्ती आली. दुसरा व्हिडिओही जरूर बनवून देऊ. चित्रे नील कडे पाठवून ठेवा.
आमचा youtube channel subscribe केल्या बद्दल धनयवाद! 🙏अशीच सुंदर सुंदर चित्रे रंगवून आनंद वाटत रहा याच शुभ कामना!🌹🌷🪷🌻🙏👌. माझे मित्र जयेंद्र सुर्वे यांच्या प्रतिक्रिया....राम मला तुझे पुस्तक खूप आवडले। भाषा सरल आणि प्रत्येक घटना रसपूर्ण प्रकारे सांगितलेस आहे मना पासून पसंत केले जीवावर बेतलेले प्रसंग वाचाताना अंगावर शहारे येतात. माझा वर्गमित्र सुभाष चव्हाण यांच्या माझ्या पुस्तकावरील प्रतिक्रिया...राम मला तुझे पुस्तक खूप आवाडले. भाषा सरल आणि प्रत्येक घटना रसपूर्ण प्रकारे संगीतलि आहेस.मना पसून पसंत केले.जीवावर बेतलेले प्रसंग वाचाताना अंगवसर शहरे येतात. [3/2, 15:57] Parsharam Kelkar: राम तुझे साद सागराची हे पुस्तक सर्व वाचल तू तुझा जीवनपट इतका छान उलगडला आहेस.काही वेळा आपणच तो आहोत अस वाटल. इतका जिवंत पणा जाणवतो.
तुझ्याजिवनातील सर्व घटनाअविसमरणीय आहेत आपणच आपल्या जीवनाचे शिल्प कार असतो हेच खरे जीवन खुप छान वाटल प.दा.केलकर रत्नागिरी. सुहास माधव केळकर. नमस्कार शिवरामजी मी आपले पुस्तक वाचले खुप छान वाटले थोड्या भूतकाळातील काही आठवणी जागृत झाल्या ऊदा आपला पान सेहेचाळिस वरील नाॅरथ कोरियातील बेल बाॅटम पॅन्ट मधील फोटो त्या काळी या फॅशनची खुप क्रेझ होती मी वापरली होती असो म्हणून मुद्दाम लिहीले धन्यवाद 🤣👏. [3/20, 18:17] Anuradha E Book जयश्री केळकर श्रीकांत वहिनी: रामकाका, आज दुपारपासून बसून सर्व पुस्तक वाचून काढले. फार मजा वाटली. वेगवेगळ्या अनुभवांना तुम्हाला सामोरे जायला मिळाले. समुद्रावरचे अनुभव चित्तथरारकच असणार.
मला वैयक्तिक समुद्र , आकाश आणि जंगल यांची ओढ आहे . आज दिवसभर समुद्रातच बोटीवर वावरत होते.छान वाटले.
[3/20, 18:18] Anuradha E Book जयश्री केळकर श्रीकांत वहिनी: नातवाने मोबाईल आडवा करुन कसे वाचायचे ते सांगितले .त्यामुळे त्रास झाला नाही . सीमा केळकर....आज वाचले
खूपच छान वर्णन,अनुभव
माझे 2,3 नातेवाईक आहेतसध्या बोटीवर
2 निवृत्त आहेत त्यामुळे छान वाटले वाचायला👌👌👌 सौ संगीतासाठी सातारा.. यांच्या प्रतिक्रिया....सुरक्षित सामाजिक कोषात राहणारी मी दर्यावर्दी जीवनाबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते. केळकरांबरोबर ऋणानुबंध जुळल्यावर आणि नुकतेच श्री रामदादा केळकर यांचे 'साद सागराची' हे पुस्तक वाचल्यावर अथांग सागरावर हेलकावत प्रवास करणाऱ्या बोटीवरील जीवनाची खडतरता जाणवली स्वानुभवावर आधारित या पुस्तकातून राम केळकरांचा जीवनप्रवास वादळी जीवनप्रवास समजला.......
सागरी लाटांवर हेलकावणाऱ्या त्यांच्या जीवन नौकेचा 'मृणाल' हा सुविद्य पत्नी रूपी नांगर मात्र भक्कम आणि खंबीर होता. त्यामुळेच संसार तारु यश, समाधानाच्या तीरावर सुखरूप पोचले. पती बोटीवर असताना दोन मुलांसह संसार सांभाळण्याचे, रामदादांच्या जीवघेण्या आजाराचे आव्हान त्यांनी पेलले आहे. हे काम शिवधनुष्य उचलण्या इतकेच कठीण आहे. त्यांच्या मुशीत घडलेला 'प्रांजल' नावाचा अस्सल हिरा माझा जावई आहे. यापरते भाग्य कोणते ? जीवनातील अनेक वादळांना सामोरे जाणाऱ्या दर्यावर्दी 'श्री. राम केळकर यांचे 'साद सागराची'
हे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि रोमांचक आहे. सौ संगीता शेखर सप्रे सातारा..... सौ सुलभा जोशी माजी.नगरसेविका सांगली यांनी दिलेल्या प्रतिक्रिया....नुकतेच 'साद सागराची' हे राम केळकर यांचे
पुस्तक वाचले. बोटीवरील जीवन किती धोकादायक
असते याची माहिती मिळाली. वेळोवेळी मृणालिनी
केळकर यांनी धैर्याने दिलेली साथ वाचून त्यांचे
फार कौतूक वाटले
सौ. सुलभा
जोशी
सांगली. श्री. बोबडे, बावधन पुणे. यांचा पुस्तकावर अभिप्राय.
__END_OGreat Book - liked it 👍👍