माझ्या साद सगाराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..2

                  तुम्ही पाठवलेल
'साद- सागराची' हे e-पुस्तक
वाचल mobile वर वाचल त्यामुळे वेळ लागला-
पण छान वाटल. सागरी जीवनावर वाचलेल माझ हे
पहिलच पुस्तक. तुम्ही आपले अनुभव लिहून काढले,
त्याबद्दल तुमच खूप अभिनंदन आणि कौतूक पण.
सागरी जीवन जगण्याला खूप हिंमत आणि धडाडी
लागते. सर्वसाधारण back-ground मधून येऊन
तुम्ही १५-२० वर्ष असे असे जीवन जगलात ही फार
मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही आपला
चित्रकलेचा छंद" ओपासला हे पण छान केल.
on-shore पेक्षा 0ff-shore अनुभव
जास्त आवडलेल - exciting आहेत. तसेच
काही जीव होणे प्रसंग'पण मस्त आहेत. कधी
भेटलो की गप्पा करायला पण आवडेल.
Take care and stay safe.
once again - congratulations.
(Dinkar Salade)
busobe)
(D. p. Bobcle)
18.4.2024Great Book - liked it 👍👍.                  सौ . सुरेखा ताईंची माझ्या साद सागराची या पुस्तकावर प्रतिक्रिया..'साद सागराची' हे राम केळकर यांचे पुस्तक वाचले. अतिशय सुरेख !
मुंबईत मरीन इंजिनिअरींग करून तो बोटीवर रुजू झाला. नाविक अभियांत्रिकी या बद्दल विशेष कोणाला माहीत असेल अस वाटत नाही आणि ते स्वाभाविकच आहे. ५० वर्षापूर्वी फार कठीणच तो काळ,आणि या पठ्या ने हे सर्व स्विकारले,जिद् होती ! इतकी माहीती त्याने दिली आहे. बोटी चे इतके प्रकार आम्ही ऐकलेले नाही. त्यावरची सफर तर दूरच!वाचताना फार भिती वाटेते. जीवा वरील संकटे घाबरवून टाकतात. मजा कसली जीवघेणे प्रसंगच ते! ६/६ महिने कुटुंबासाठी दूर राहाणे.कुटुंबासाठी राब राब राबायचे आणि त्यांच्याच पासून दूर राहायचे ६/६ महिने. आपण स्वतःहून स्वीकारलेली ही परिस्थती.
जीवा वरचे प्रसंग तर कितीवेळा आले आणि त्यातून राम सहिसलामत आला प्रत्येक वेळी ही त्या रामाची कृपा नाहीतर काय म्हणू।
मृणालने एकटीने हे सगळं पेललं हे तिचे केवढे कौतुक ! पैसा दिसतो , वरवर जग फिरतान चे लोका ना दिसते, हेवा वाटतो पण  कश्या परिस्थिती तून जाव लागते हे त्याना कळत नाही. राम संसार चालवण्यासाठी संसारा पासून कोसो मैल दूर रहावे लागणे यापेक्षा मोठी परीक्षा ती कोणती? राम तुला सलाम! राम सदा सुखी ठेवो हीच प्रार्थना श्रीरामाच्या चरणी करते सौ. सुरेखा द. नाफडे, रत्नागिरी.                                       माझा बालपणीचा मित्र विजय विचारे डोंबिवली त्यांनी माझ्या पुस्तकावर पाठवलेल्या प्रतिक्रिया...अथांग सागरावर हेलकावत प्रवास करणाऱ्या बोटीवरील जीवनाची खडतरता रामच्या "साद  सागराची, या पुस्तकात वाचायला मिळते प्रत्येक बोटीवरील प्रवास वर्णन हृदयाला भिडणारे आहे           मी जेव्हा हे पुस्तक रात्री वाचायला  घायचो तेव्हा  तो महाप्रलयी सागर वादळी वाऱ्याचे घोघावणारे आवाज बोटीचे वर  खाली पाण्यात जाणे येणे ही सारी दृश्य  मला स्वप्नात दिसायचीआणि मी रात्री ओरडत उठायचो त्यामुळे माझ्या घरातील लोकांनी पुस्तक  लपवून ठेवले इतके ते पुस्तक परिणामकारक वाटले रामने पंधरा वर्षे कशी काढली  असतील तोच जाणे              रामने जे अनुभवले ते आमच्या  मित्रांपैकी कोणीही धाडस केलेले नाही राम  तू खरंच ग्रेट आहेस  जीवनातील जगणं खऱ्या अर्थाने तू जगलेला आहेस तुला शतश:  प्रणाम!                                डॉ. अभिजीत काळे बावधन पुणे. यांच्या साद सागराची या पुस्तकावर त्यांनी दिलेला अभिप्राय.....आज सागराची हे पुस्तक श्रीयुत राम खेळकर यांनी लिहिलेल्या वाचून संपवले. अतिशय आकर्षक अशी आकर्षक अशी पुस्तकाची रचना आहे.  वाचताना अतिशय छान असं रंजक पुस्तक आहे. सांगण्याची लेखनाची शैली अतिशय छान आहे. तसेच त्यांचे फोटोही अतिशय चांगले आहेत तसेच त्यांचा एक छंद आहे तो मोबाईल पेंटिंग याचा .काही चित्र त्यांनी दिली आहेत. सामान्य माणसाला त्यांच्या एक सेलरच्या जीवनात लोकं पाहण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळू शकते .  लिहिलेला शेवटचा लेख जो एक सेलरच्या पत्नीचा अनुभव किंवा अभिप्राय म्हणता येईल तोही अतिशय सुंदर आहे त्यांचे अनुभव बोटीवरचे बोटी बाहेरचे डेक वरील स्पेशली बोटीवरचे अतिशय सुंदर रीतीने सांगितलेले आहेत.  अतिशय काय म्हणू..आपण त्याला एक आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आलेले आहेत तसेच बोटीवरचे बरेचशे टेक्निकल गोष्टी ज्या सामान्य माणसांना माहीत नसतात  म्हणजे रोलिंग पिचिंग काय की लाटांचा वादळांचा अनुभव हे सर्व अतिशय चित्त थरारक आहे . पुस्तक वाचून  अतिशय मजा आली श्री. राम केळकरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!... डॉक्टर अभिजीत काळे बावधन पुणे

Popular posts from this blog

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

माझ्या साद सागराची या पुस्तकावर आलेले अभिप्राय..1

मोबाईल पेंटिंग एक छंद...