सेकंड इनिंग...
आधी शिप वरील नंतर मुंबईच्या धावपळीच्या नोकरी नंतर पुण्यात फक्त आराम च करायचा असा विचार करून २०१२ साली रिटायरमेंट घेतल्यानंतर मी आणि माझी पत्नी पुण्याला मुलाकडे राहायला आलो. पहिले काही दिवस खाणे ,पिणे ,फीरणे यात दिवस कसे गेले कळले नाही. पण इतर दिवस भर काय करायचं असा प्रश्न पडला.त्या वेळी मी नवीनच स्मार्ट फोन घेतला होता.ड्रॉइंग आणि पेंटिंग करायची मला आवड होती म्हणून मोबाईल वर ड्रॉइंग पेंटिंग ॲप पाहून वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉइंग करायला सुरुवात केली. मोबाईल मुळे पेंटिंग करण्या साठी लागणारे रंग पाणी ब्रश हे सर्व ॲप मध्ये असल्यामुळे मूड आला की एका जागी बसल्या बसल्या वीस पंचवीस मिनिटात एक चित्र होऊन जायचं .जसं तसं मनात असायचं तसं. हा फावल्या वेळेत ला छंद मला लागला. मूड लागला की खूप चांगली चांगली पेंटिंग झाली. मित्रांच्या सल्ल्यामुळे एकदा मी माझ्या मोबाईल पेंटिंग वरील मित्राचं प्रदर्शन पुण्यामध्ये केलं ज्येष्ठ चित्रकला कलाकार श्री. मंगेश तेंडुलकरांना माझी पेंटिंग आणि मोबाईल पेंटिंगचा प्रकार खूप आवडला. एक ज्येष्ठ युट्युबर श्रीमती मधु सागर आणि माझी एक मुलाखत देखील घेतली . ती खूप जणांना आवडली. माझा मित्र अरुण काकतकर यांनी त्यांच्या चित्राक्षरी या पुस्तकात देखील माझ्या पेंटिंग वरती काही कविता तसेच साताऱ्याच्या संगीता सप्रे यानी देखील केल्या.आता मी मूड लागला की चांगली चांगली चित्र काढतो आणि त्याच्या प्रिंट काढून फ्रेम करून आप्तेष्ट आणि मित्रांना प्रेझेंट करतो.लोक याचा कौतुक करतात.अलीकडेच माझ्या सागरी जीवनावर " साद सागराची" हे ई बुक साहित्य वरती प्रकाशित केलं गेलं.