देव तारी त्याला कोण मारी ... एक जीवघेणा प्रसंग...

ओरीनको वर काम करत असताना ती टगबोट बुडाल्या नंतर वादळातील 26 तास ...
राम केळकर यांना त्यांचे मित्र श्री. तानाजी बक्कळ यांनी सांगितलेली भयानक जीवघेणी आठवण... त्यांच्याच शब्दात..
जून 1998. कांडला एक गुजरातीतील एक मोठे बंदर.
संध्याकाळची वेळ होती. आकाश पूर्ण काळं पडलं होतं. 'ओरीनको' नावाचा आमचा salvage टगबोट समुद्रात वादळाला तोंड देत उभा होता. आमचं काम होतं - वादळात अडकलेल्या मोठ्या बोटी आणि टँकरना दोराने बांधून बंदरा पर्यंत सुरक्षित आणणं.

पण त्या दिवशी वादळाने अचानक रौद्ररूप घेतलं. सोसाट्याचा वारा 100 किमी पेक्षा जास्त वेगाने वाहत होता. गेल फोर्स 7 म्हणजे समुद्रातील वादळातील एक प्रकारचा प्रचंड मोठा.समुद्र उसळला होता. टग बोट  इतका हलत होता की रोलिंग-पिचिंग मुळे एका सेकंदात वर आणि दुसऱ्या सेकंदात खाली जायचं. दोन्ही बाजूंनी लाटांचे तडाखे बसत होते. डेकवर उभं राहणं अशक्य झालं होतं. जिथे जागा मिळेल तिथे धरून उभं राहावं लागत होतं.

एका बाजूला आम्ही अँकर टाकला होता आणि दुसऱ्या बाजूला दोन मोठ्या टँकरना लावायला 3-4 जाड फेंडर्स लावले होते. वादळामुळे दोर ताणले जात होते आणि त्यामुळे बोटीला लाटे प्रमाणे ऍडजेस्ट होता येत नव्हते.

तो एक मिनिट... 
एका प्रचंड लाटेने एकाच झटक्यात टगला उचलून आपटलं आणि एका बाजूला एकदम कलंडली . आम्ही इंडियन रूम मध्ये आणि डेक वरती असलेले आम्ही ५ जण एकदम कलंडलो. आमच्यातला एक फिटर इंजिन चालू करायला खाली गेला होता. वादळाचा आवाज आणि अलार्म ऐकून तो कसाबसा इंजिन रूम मधून बाहेर पडला. त्याच वेळेला आम्ही सगळे 6 जण जीव मुठीत धरून बोटीतून  समुद्रात उडी मारून दुसऱ्या बाजूला  बाहेर पडलो.

पुढे काय होईल हे कळायच्या आतच _ओरीनको_ बुडायला लागली. आमच्या 6 जणांपैकी कोणालाही पोहता येत नव्हतं.  मृत्यू समोर दिसताच जीवाच्या भीतीने आम्ही खवळलेल्या समुद्रात उडी मारली होती.

पाण्यात एक मोठा 6 इंची गरवारे नायलॉन चा दोर तरंगत होता. तोच आमचा आधार झाला. त्याला आम्ही सगळ्यांनी घट्ट पकडलं. अंधार, पाऊस, लाटा... आणि आम्ही एकमेकाला "सोडू नका", "टिकून रहा" असा धीर देत होतो.

बोट दीड-दोन मिनिटात पूर्ण बुडून गेली. काही लोक किनाऱ्यावर डॉक्टरांकडे किंवा कामासाठी गेले होते, तेवढेच वाचले. बाकीचे सगळे बोटीतच अडकून बुडाले.

आम्ही 6 जण... 26 तास... पोहता न येताही त्या थंड, काळ्या समुद्रात त्या एका दोराला धरून होतो. लाटा डोक्यावरून जायच्या, पाणी तोंडात-नाकात जायचं, शरीर बधीर झालं होतं, पण हात सोडला नाही. जेवण खाणं सोडा साधं पाणी प्यायला नव्हतं. देवाची धारणा करत स्वतःचे मरण स्वतः डोळ्यांनी बघत होतो .परंतु एकमेकांना धीर मात्र देत होतो. दहा-बारा तसा नंतर हळूहळू वादळाचा वेग कमी होत गेला परंतु समुद्र पुरा शांत झाला नव्हता.
26 तासांनंतर किनाऱ्यावरील लोकांनी आणि इतर बोटींनी आम्हाला ओढून काढलं. जिवंत होतो, पण आतून मेलेल्या सारखे.

नंतर बुडालेल्यांचे मृतदेह सापडले. ते फक्त त्यांच्या अंगावरील कपड्यां वरूनच ओळखता आले. ते फोटो मी पाहिले... इतके भयानक होते की कित्येक रात्री झोप येत नव्हती.

माझा तो मित्र जेव्हा हे सांगत होता, तेव्हा डोळ्यासमोर तो बोटीवरील एक मिनिट, ते काळं आकाश, ती उंच लाट आणि 6 जण एका दोराला बिलगून बसले दिसायचे.


आमच्या मित्राचं आणि त्या 5 सहकाऱ्यांचं धैर्य आणि जिद्द याला सलाम !  
पोहता न येताही 26 तास पाण्यात टिकून राहणं म्हणजे चमत्कारच.! खर आहे देव तारी त्याला कोण मारी.. या वादळात काही टकबोट, आणि छोट्या-मोठ्या बोटी दोन-दोनशे मीटर रस्त्यावर आल्या होत्या.पोर्ट मधील असलेल्या रेल्वे रुळ वेडेवाकडे झाले होते. इमारती पडल्या होत्या सर्वत्र घाण पसरली होती हे सर्व नंतर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. खूप मानव आणि इमा रती, दुकाने, हॉटेल नुकसान झाले होते. ह्या माझा मित्रने घरी येऊन मला सर्व सविस्तर खरे तर लिहून दिले होते .पण पेपर माझ्याकडून हरवला गेला. म्हणून आठवत असलेले ईथे  लिहिले आहे . बोटीवरील जीवन खूप धोक्यात असत. केवळ देवावर विश्वास ठेवूनच नोकरी करावी लागते. सैनिक युद्धावर लढतात आणि मरीनर समुद्रावर वादळाशी...........राम केळकर मरीन इंजिनियर बावधन पुणे. 

Popular posts from this blog

मालगुंड मधील आमच्या लहानपणीचे कमळाचे तळे

आमचे पूर्वजांचे खालचे घर येथे मी जन्मलो आणि आयुष्याची सहा वर्ष राहिलो

मोबाईल पेंटिंग एक छंद...