Posts

आमचे पूर्वजांचे खालचे घर येथे मी जन्मलो आणि आयुष्याची सहा वर्ष राहिलो

Image
आमचे पूर्वजांचे खालचे घर....प्रथम मी, शिवराम विनायक केळकर उर्फ राम केळकर..कारण मला सर्वजण राम नावांनीच घरात आणि गावात ओळखायचे आणि आता पण ओळखतात.अगदी सहा साडेसहा वर्षाचा होईपर्यंत आमच्या पहिल्या मूळ घरात एकत्र कुटुंबात जन्मापासून राहत होतो. त्याला आम्ही खालचे घर म्हणायला लागलो. वरती नवीन घर बांधल्यावरती! एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मी माझे वडिलांचे  काकू, काका, तीन आजा माझी भावंड म्हणजे ताई मोठा भाऊ दिलीप आणि दत्ता आणि आई बाबा तीन काका तीन आत्या आणखी काही नातेवाईक असं खूप मोठं गजबजलेलं घर असायचं. घराच्या बाजूला मोठा गोठा होता. त्यामध्ये भरपूर काही म्हशी बैल रेडे असे होते आमच्या दोन बैलगाड्या होत्या.सर्व शेती घरीच होत होती.घराच्या मागे मोठी नारळी पोफळी आणि केळीची बागं होती. खूप मोठी विहीर होती.विहिरीला रहाट गाडगे जोडलेलं असायचं.त्याच्यातून चिरेबंदी दगडाच्या द्रोणी मध्ये भरपूर पाणी येत असे. दोन बाजूला दोन द्रोणी होत्या . द्रोणीला लागूनच नहाणी घर होतं . एक रेडा दिवसभर रहाट गाडग्याला जोडलेला असायचा. ओव्हर फ्लो होत असलेले पाणी नारळ केळी आणि पोफळी च्या बागांना जात असायचे.घरघडी त...

गुंडीची बटणे

  गुंडीची बटणे ही पोस्ट वाचून जुन्या काळातील तो साधेपणा आणि कौशल्याची आठवण डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहिल. ​ सुरुवातीला ज्या चट्ट्या-पट्ट्यांच्या लहान मुलांच्या कपड्यांबद्दल लिहितो आहे, त्याला 'डंगरी' (Dangri) किंवा 'बिब-पँट' (Bib-pant) म्हटलं जायचं. पाठीमागून क्रॉस करून पुढे आणलेले ते बंद आणि नाड्यांची ती गंमत... आजच्या महागड्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा त्या घरगुती कपड्यांमध्ये खूप जास्त सोय आणि माया असायची. ​'गुंडीच्या बटनांबद्दल'  जे लिहिलं आहे, ते तर अगदी मोलाचं आहे. प्लास्टिक किंवा मेटलच्या बटनांचा शोध लागण्यापूर्वी किंवा ती सहज उपलब्ध नसताना, हाताने दोऱ्याचे किंवा कापडाचे छोटे छोटे चेंडू  बनवून ही बटणे तयार केली जायची. त्यासाठी लागणारी 'काजं' (Buttonholes) सुद्धा हातानेच विणली जायची. याला 'पोटली बटन' किंवा 'चायनीज फ्रॉग क्लोजर' (Chinese Frog Closures) असही म्हणतात. ​भारतातील सद्यस्थिती: आपल्याकडे रोजच्या वापरातून ही गुंडीची बटणे आता जवळपास हद्दपार झाली आहेत. फक्त काही पारंपरिक शेरवानी, कुर्ते किंवा डिझायनर कपड्यांमध्येच ती फॅशन म्हणून क...

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

Image
आमची शाळा 175 वर्षाची झाली म्हणून आपण श्री गणेशा जिथून शिकलो त्याबद्दल काही लिहाव असे वाटले म्हणून हा लेख लिहीत आहे.आत्ताची मालगुंड ची जीवन शिक्षण शाळा ही पूर्वी पूर्ण प्राथमिक शाळा मालगुंड या नावाने होती, शाळेची स्थापना १९५१ साली झाली. पाच जून रोजी या शाळेला १७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या शाळेबद्दल हा लेख मी लिहीत आहे. १९५५ साली मी या शाळेत पहिली मध्ये दाखल झालो. म्हणजे सुमारे ७५ वर्षापूर्वी. गणपतीपुळे खाडी पार करून मालगुंड मध्ये शिरल्यानंतर पुढे काही अंतरावरच डाव्या बाजूला आमची ही जीवन शिक्षण शाळा आहे. त्यावेळी इंग्रजीची C आकारामध्ये दगडी बांधकामाची मजबूत होती आणि आताही अशीच आहे. जमिनी शेणाने सारवलेल्या  असत, प्रत्येक विद्यार्थी आपली बैठक गोणपाटाची घेऊन येत असत. शाळेच्या पुढील भागामध्ये एक सुंदर बाग होती. आम्ही शाळेत जायला लागल्या नंतर काही वर्षांनी त्या बागे मध्ये झोपाळा, गोलाकार फिरणारे चक्र, सिसॉ आणि घसरगुंडी हे लाकडाचे चार प्रकार लागले . त्याच्या सभोवती छान पैकी बगीचा केला गेला होता. शाळेच्या इतर तिन्ही भागांमध्ये साधारण सात आठ फूट जागा सोडून निगडी च्...

मी आणि संगीत...

Image
तसा माझा आणि संगीताचा संबंध अगदी लहानपणा पासून. गावामध्ये झोपाळ्यावर रोज संध्याकाळी शुभम करोति, रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि त्यानंतर काही श्लोक झाल्यावर आमच्या आत्या आम्ही सर्व भावंड आणि  शेजारची आलेली काही मुले असे सर्व जुनी गाणी रोज म्हणत मोठे झालो. त्यावेळी आशा भोसले ,लता मंगेशकर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपुर यांची भावगीते जास्ती करून आमच्यापेक्षा मोठी असलेल्या ताई आणि आत्या या म्हणत असत. नंतर आम्ही आमच्या शाळेतील कविता मोठ्याने म्हणायचो. हे रोजचे कार्यक्रम. रामनवमीला वगैरे गावातील देवळामध्ये भजन कीर्तन चालायचे. तसे काही संगीत नाटके गावात कधीतरी येणारे नाटक कंपनी सादर करायचे ,ते पाहायला आणि ऐकायला मात्र आम्ही जात असोत. नाटकातील एखादे संगीत कलाकार पुण्या मुंबईवरून येत असत. संगीत सौभद्र, मंदार माला,स्वयंवर अशी आणि इतर नाटके ते करत. भार्गवराम आचरेकर हे एक चांगले आठवतात! बाकी शाळेतील शारदोत्सवा मध्ये आम्ही लहान मुलांनी केलेली, नाचलेली गाणी आणि काही मुलींचीच नृत्य आणि गाणी होत असत. गावातील हौशी तबला आणि पेटी वादक अशा कार्यक्रमाला साथ देत. विठ्ठल मंदिरात होणाऱ्या नाटकामध्य...

हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था कशी असते..

Image
हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था ..शिप वरती केलेल्या पंधरा वर्षा मधील कामे आणि वादळी संकटे ,टेन्शन च्या परिणामा मुळे कीवा नंतर दोन वर्ष शिप रिपेरिंग वर्क शॉप मध्ये आलेले टेन्शन आणि शरीराचे झालेले हाल, म्हणजे कोणत्याही वेळी,दिवस आणि रात्री अवेळी किती वेळ दग दग आणि कमी झालेली झोप यामुळे पण माझा वयाच्या 38 वर्षी डावा हात दुखायला सुरुवात झाली. पहिले दोन-तीन महिने विशेष लक्ष दिले गेले नाही.नंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना स्पॉंडि लायसिस वाटले. त्यावर त्यांनी मानेला बांधायचा पट्टा दिला. तो दोन-तीन महिने वापरला, हात दुखत होताच.नंतर एक दोन महिन्या नंतर डोळे ओढल्या सारखे वाटायला लागले. डोळ्याला नंबर आहे म्हणून चष्मा दिला पण पॉइंट 0.25 होता.तरीही हात दुखत च होता. थोडा थोडा दम लागत होता. नोकरी चालूच होती शिप रिपेरिंग काम चालू होतं. शिव वरती वर खाली ड्रायडॉक मध्ये अशी खूप दगदग व्हायची.एक दिवस ड्रायडॉक मध्ये शिप असताना  खूपच दम लागू लागला. चार पावलं चाललं पण कठीण होतं होत, सोबतच्या एका कामगाराला घेऊन घड्याळ गोदी ते मशिद बंदर कसा बसा थांबत थांबत गेलो. आणि तासा भरात रेल्व...

वेळ काही पूरत नाही....

आयुष्य वाढते वेळ काही पुरत नाही,                                राहिलेल्या कामांची लिस्ट काही संपत होत नाही !                                            बालपणीच्या, तरुणपणीच्या, नोकरी करत असतानाच्या, आठवणी लिहायला वेळ काही पुरत नाही!                             मित्र,मैत्रिणीचे लहानपणीचे चेहरे आठवतात,                    प्रत्यक्ष भेटीत ओळखता येत नाही!                                                           नव्या जगात नव्या युगात मोबाईल वरील खंडीभर ॲप मुळे,                    ...

मोबाईल पेंटिंग एक छंद...

Image
तशी मला लहानपणापासूनच ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड होती. साधारण तिसरी,चौथीचा असताना शाळेमध्ये दसऱ्याला पाटी वरती आम्ही सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा करायचो .बहुतेक सर्वजण एक एक आकडा काढून त्याचं रांगोळी सारखं चित्र काढायचे. मी मात्र सरस्वती देवीचा फोटो काढायचा प्रयत्न करायचो आणि ते बऱ्यापैकी चांगलं व्हायचं. हळूहळू पुढे माझे काही मित्र पण माझ्याकडून त्यांच्या पाटी वर चित्र काढून घेत. लहानपणी रफ पेपरवर मी खूप रेखाचित्र काढायचो .त्यावेळी आमच्या बाजूला एक गोखले मास्तर म्हणून राहत होते. ते मला कधी कधी थोड गाईड करत. आठवीमध्ये गेल्यानंतर मला इंग्लिश शाळेमध्ये चित्रकला विषय होता ते बहुदा कोसुंबकर किंवा मेहंदळे गुरुजी शिकवायचे. त्यांना माझी चित्रे  खूप आवडायची. त्यांनी  मला ड्रॉइंग च्या पहिल्या परीक्षेला बसवले . आणि पुढील वर्षी लगेच दुसऱ्या परीक्षेला बसवले . मी परीक्षा पण पास झालो. महाराष्ट्र शासनाची परीक्षा असायची. शाळेमध्ये असताना देखील क्लास चालू असताना  वहीच्या मागील पानांवर मी असंच रेखाटन करायचो. असा कधीच दिवस गेला नाही की मी क...