Posts

एकदा काय झालं....

Image
साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी बायपास सर्जरी होऊन दोन-तीन वर्षेच झाली होती. वय तेव्हा ५५ च्या आसपास. डॉक्टरांनी जपून राहायला सांगितलेलं, पण नशिबाला कदाचित माझी परीक्षाच घ्यायची होती. माझे सासू-सासरे ठाण्यात, चरईत आमच्या घरापासून अगदी पाच-सहा मिनिटांच्या अंतरावर राहत होते. वय दोघांचेही ७५ च्या जवळपास. घरी दोघेच. एके रात्री दहाच्या सुमारास त्यांनी घराचा मेन दरवाजाचा लॅच लावला आणि काही कारणाने पुन्हा उघडायला गेले, तर दरवाजा काही केल्या उघडेना. आतूनही नाही आणि बाहेरूनही नाही. कुलूप जाम झालं होतं. घरात दोन वृद्ध माणसं अडकली. त्यांनी जवळ असलेला स्क्रू ड्रायव्हर, पक्कड घेऊन खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी काळजीने त्यांनी मला फोन केला, " अहोराम, आम्ही घरात अडकलो आहोत. दरवाजा काही उघडत नाहीये. काहीतरी करून उघडून द्या बाबा." फोन ठेवला आणि मी आणि माझी पत्नी लगेच स्कूटरवरून त्यांच्या सोसायटीत पोहोचलो. त्यांचा फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर. मुख्य दरवाजा बाहेरूनही उघडत नव्हता. मग एकच मार्ग उरला - शेजारच्या बाल्कनीतून त्यांच्या बाल्कनीत जाणे. जमिनीपासून साधारण २५-३० फू...

जीवन सुंदर आहे!

जीवन सुंदर आहे! आनंदी आहे!!नक्कीच, जीवन सुंदर आहे! जीवन हे एक अद्भुत प्रवास आहे. या प्रवासात आनंद, दुःख, यश, अपयश, प्रेम,  असे अनेक रंग असतात. या रंगांची सांगड घालूनच आपले जीवन सुंदर बनते. जर तसं वय वाढत I 8ouhkk(8जाते तसे तसे आपल्याला खूप अनुभव अनुभवायला मिळतात. प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. मी बोटी वरती मरीन इंजिनियर म्हणून नोकरी केली तिथेच साहस म्हणजे काय हा अनुभव आला. वेगवेगळ्या प्रकारची वादळे, अपघात, हे अनुभवत असताना देखील समुद्र, आकाश, चंद्र, सूर्य ,तारे क्वचित तूटणाऱ्या तारका यांचे विलोभनीय वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य पण मनाला आनंद देऊन जायचे. सूर्योदय सूर्यास्त यांचे आकाशा मध्ये थोड्या थोड्या अंतराने बदलणारे रंग मनाला आनंदित करून जात असत. वादळात हेलकावत असणाऱ्या बोटीवर हमखास सर्व आप्त आणि मित्रांची आठवण होते. कारण पुढे काय होणारे हे आपल्याला माहिती नसते. सर्व आपापल्या देवावर विश्वास ठेवून असतात. त्याला साहस साथ देते!घाबरून न जाता संकटाशी चार हात करायला धीर देतात. बोटीचा प्रवास चालू असताना ड्युटी शिवाय इतर 16 तास प्रत्येक जण आपले छंद जपत असतात. काहीना गाण्याची आव...

साबण एक पूर्ण पिढीचा प्रवास. प्रवास आहे ....

Image
साबण एक पूर्ण पिढीचा प्रवास. प्रवास आहे .... लाईफ बॉयच्या लाल साबणा पासून ते आजच्या लिक्विड सोप पर्यंत... आणि मधला तो "हातून सटकणारा साबण" वाला संघर्ष... साबण आणि आपलं आयुष्य - लाल लाईफ बॉय पासून लिक्विड सोप पर्यंत! 1. लहानपणीचा लाल दैत्य - लाईफ बॉय, हमाम लहानपणी साबण म्हणजे फक्त लाईफ बॉय आणि हमाम.  लाईफ बॉय तर हात धरता येणार नाही एवढा मोठा आणि लाल. रेडिओवर "लाईफ बॉय है जहाँ, तंदुरुस्ती है वहाँ" हे गाणं दिवसातून दहा वेळा लागायचं. त्यामुळे तो साबण म्हणजे आरोग्याचं प्रतीक वाटायचा. अंग घासून घासून लाल व्हायचं, पण साबण संपता संपत नसे. 2. मोठे झाल्या वरचा खजिना - बोटीवरील इम्पोर्टेड साबण... नोकरीला लागलो, बोटीवर गेलो... आणि तिथे महिन्याला 4-4 इम्पोर्टेड साबण मिळायचे. आम्हाला तेवढे लागतच नव्हते. त्यामुळे साबण जमा होत गेले. सुट्टीला घरी येताना बॅग भरून साबण आणायचो.पत्नी म्हणायची "आता वर्षभर साबण विकत घ्यायची गरज नाही". तो काळ वेगळाच होता. 3. वय वाढलं आणि सुरू झाली खरी कसरत 60-65 नंतर आंघोळ म्हणजे एक युद्धच.  साबण हाताला लावला की तो सटकतो. हातावर साबण,...

समुद्राचे सात गळे - जिथे जगाचा श्वास अडकतो...

Image
समुद्राचे सात गळे - जिथे जगाचा श्वास अडकतो* समुद्र... दिसायला किती शांत. निळा, विशाल, आणि मोकळा.  पण या शांततेच्या पोटात 7 असे गळे आहेत जिथे जगाचा श्वास अडकतो. इथे एक लाट जरी चुकली, एक बोट जरी आडवी झाली, की खंडां मधला व्यापार कोल मडतो. यांनाच आपण "समुद्राचे चोक पॉईंट्स" म्हणतो. 1. हार्मुझ - तेलाची नाडी इराण आणि ओमान यांच्या कुशीत विसावलेली 33 किमी रुंदीची चिंचोळी. जग पीत असलेल्या प्रत्येक 5 बॅरल तेला पैकी 1 बॅरल इथूनच वाहतो.  इथे वारा वाहत नाही, अफवा वाहतात. "आज इराण बंद करेल का?" ही भीतीच इथली सर्वात मोठी लाट आहे. 2019 मध्ये इथे आग लागली तेव्हा जगभर पेट्रोलने उसळी मारली. 2. सुवेझ - वाळवंटातली जखम. इजिप्तच्या वाळ वंटाला चिरत जाणारी मानवनिर्मित नदी. युरोपला आशिया शी भेटवणारा शॉर्टकट.  पण ही नदी दोनदा रक्ताळली. एकदा 1956 च्या संकटात, आणि दुसऱ्यांदा 1967 मध्ये. सहा दिवसांच्या युद्धानंतर इजिप्तने स्वतःच आपल्या कुशीत जहाजं बुडवली आणि 8 वर्षे... हो 1975 पर्यंत हा कालवा मुर्दाड पडला होता. 2021 मध्ये एका _Ever Given_ ने पुन्हा जगाला 6 दिवसांचा धडा दि...

देव तारी त्याला कोण मारी ... एक जीवघेणा प्रसंग...

Image
ओरीनको वर काम करत असताना ती टगबोट बुडाल्या नंतर वादळातील 26 तास ... राम केळकर यांना त्यांचे मित्र श्री. तानाजी बक्कळ यांनी सांगितलेली भयानक जीवघेणी आठवण... त्यांच्याच शब्दात.. जून 1998. कांडला एक गुजरातीतील एक मोठे बंदर. संध्याकाळची वेळ होती. आकाश पूर्ण काळं पडलं होतं. 'ओरीनको' नावाचा आमचा salvage टगबोट समुद्रात वादळाला तोंड देत उभा होता. आमचं काम होतं - वादळात अडकलेल्या मोठ्या बोटी आणि टँकरना दोराने बांधून बंदरा पर्यंत सुरक्षित आणणं. पण त्या दिवशी वादळाने अचानक रौद्ररूप घेतलं. सोसाट्याचा वारा 100 किमी पेक्षा जास्त वेगाने वाहत होता. गेल फोर्स 7 म्हणजे समुद्रातील वादळातील एक प्रकारचा प्रचंड मोठा.समुद्र उसळला होता. टग बोट  इतका हलत होता की रोलिंग-पिचिंग मुळे एका सेकंदात वर आणि दुसऱ्या सेकंदात खाली जायचं. दोन्ही बाजूंनी लाटांचे तडाखे बसत होते. डेकवर उभं राहणं अशक्य झालं होतं. जिथे जागा मिळेल तिथे धरून उभं राहावं लागत होतं. एका बाजूला आम्ही अँकर टाकला होता आणि दुसऱ्या बाजूला दोन मोठ्या टँकरना लावायला 3-4 जाड फेंडर्स लावले होते. वादळामुळे दोर ताणले जात होते आणि त्यामुळे ...

मालगुंड मधील आमच्या लहानपणीचे कमळाचे तळे

Image
मालगुंडचं कमळाचं तळं  बालपणीच्या आठवणी .....   लहानपणीच्या सर्वात गोड आठवणींपैकी एक म्हणजे नदीपार असलेलं ते प्रचंड मोठं कमळाचं तळं... आमच्या घरापासून नदी ओलांडून डाव्या बाजूला, तळेपाट आणि बौद्ध वाडीच्या दरम्यान ते तळं होतं. एकराहूनही मोठी जागा असावी. घरातून नदीकडे जाताना दोन्ही बाजूला लहलहणारी भातशेती दिसायची. एका बाजूला खालच्या निवेंडीकडे जाणारा रस्ता होता - आता त्या भागाला "भगवती नगर" म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध वाडी. पूजेसाठीची कमळं... मला समज यायच्या आधीपासूनच आमची मोठी भावंडं, काका आणि गावातील इतर मंडळी तिथून कमळं आणायची. गणपतीच्या दिवसांत, विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात लाल, पांढरी आणि नाजूक "कौमुदी" फुलं आणण्याची पद्धत होती. इतर वेळीही देवपूजेसाठी किंवा देवांच्या तसबिरींना हार घालण्यासाठी हीच लाल-पांढरी कमळं वापरली जायची. कमळाचा हार करणं हा आमच्यासाठी एक खेळच होता. कमळाच्या लांब देठाला डाव्या-उजव्या बाजूने थोडे-थोडे मोडून आपल्याला हवे तेवढा सुंदर हार तयार करायचा. ती मजा काही औरच होती. तळ्यातील मजा आणि भीती... ते तळं बरंच खोल होतं. क...

इराण इराक वार 1980 ते 86 या काळातील युद्धात शिप वरती असताना झेललेला अनुभव..

Image
इराण-इराक युद्धाच्या ज्वाळांमधून... माझा समुद्री प्रवास – राम केळकर, मरीन इंजिनियर सन १९८२ ते १९८८. जगाच्या इतिहासातील एक रक्तरंजित अध्याय. इराण आणि इराक यांच्यातील भीषण युद्धाने संपूर्ण आखाती प्रदेश पेटून उठला होता. त्या काळात मी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑइल टँकरवर मरीन इंजिनियर म्हणून कार्यरत होतो. आमची जबाबदारी होती इराक, इराण आणि कुवेत येथून कच्चे तेल भारतात सुरक्षितपणे आणण्याची. मी VLCC (Very Large Crude Carrier) तसेच प्रॉडक्ट कॅरिअर अशा दोन्ही प्रकारच्या टँकरवर काम केले. गुजरातमधील वाडीनार, कांडला, मुंबईचा बुचर आयलंड, गोवा, कोचीन, तूतीकोरिन, विशाखापट्टणम, मद्रास, कोलंबो आणि त्रिंकोमली ही आमची नेहमीची डिस्चार्ज बंदरे होती. युद्धाच्या सावटाखालील प्रत्येक दिवस... तो काळ म्हणजे मृत्यूशी रोजचा सामना होता. आखातात प्रवेश केला की मनावर एक अदृश्य दडपण यायचे. कधी विमानातून रॉकेट हल्ला होईल, कधी बॉम्ब पडेल किंवा क्षेपणास्त्र येईल याचा काहीच नेम नसायचा. कोणत्या बाजूकडून हल्ला झाला, हे समजेपर्यंत अनेकदा सर्व काही संपलेले असे. आमच्या कंपनीच्या सर्व टँकरवर दोन्ही बाजूंनी आणि ...

आमचे पूर्वजांचे खालचे घर येथे मी जन्मलो आणि आयुष्याची सहा वर्ष राहिलो

Image
आमचे पूर्वजांचे खालचे घर....प्रथम मी, शिवराम विनायक केळकर उर्फ राम केळकर..कारण मला सर्वजण राम नावांनीच घरात आणि गावात ओळखायचे आणि आता पण ओळखतात.अगदी सहा साडेसहा वर्षाचा होईपर्यंत आमच्या पहिल्या मूळ घरात एकत्र कुटुंबात जन्मापासून राहत होतो. त्याला आम्ही खालचे घर म्हणायला लागलो. वरती नवीन घर बांधल्यावरती! एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मी माझे वडिलांचे  काकू, काका, तीन आजा माझी भावंड म्हणजे ताई मोठा भाऊ दिलीप आणि दत्ता आणि आई बाबा तीन काका तीन आत्या आणखी काही नातेवाईक असं खूप मोठं गजबजलेलं घर असायचं. घराच्या बाजूला मोठा गोठा होता. त्यामध्ये भरपूर काही म्हशी बैल रेडे असे होते आमच्या दोन बैलगाड्या होत्या.सर्व शेती घरीच होत होती.घराच्या मागे मोठी नारळी पोफळी आणि केळीची बागं होती. खूप मोठी विहीर होती.विहिरीला रहाट गाडगे जोडलेलं असायचं.त्याच्यातून चिरेबंदी दगडाच्या द्रोणी मध्ये भरपूर पाणी येत असे. दोन बाजूला दोन द्रोणी होत्या . द्रोणीला लागूनच नहाणी घर होतं . एक रेडा दिवसभर रहाट गाडग्याला जोडलेला असायचा. ओव्हर फ्लो होत असलेले पाणी नारळ केळी आणि पोफळी च्या बागांना जात असायचे.घरघडी त...

गुंडीची बटणे

  गुंडीची बटणे ही पोस्ट वाचून जुन्या काळातील तो साधेपणा आणि कौशल्याची आठवण डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहिल. ​ सुरुवातीला ज्या चट्ट्या-पट्ट्यांच्या लहान मुलांच्या कपड्यांबद्दल लिहितो आहे, त्याला 'डंगरी' (Dangri) किंवा 'बिब-पँट' (Bib-pant) म्हटलं जायचं. पाठीमागून क्रॉस करून पुढे आणलेले ते बंद आणि नाड्यांची ती गंमत... आजच्या महागड्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा त्या घरगुती कपड्यांमध्ये खूप जास्त सोय आणि माया असायची. ​'गुंडीच्या बटनांबद्दल'  जे लिहिलं आहे, ते तर अगदी मोलाचं आहे. प्लास्टिक किंवा मेटलच्या बटनांचा शोध लागण्यापूर्वी किंवा ती सहज उपलब्ध नसताना, हाताने दोऱ्याचे किंवा कापडाचे छोटे छोटे चेंडू  बनवून ही बटणे तयार केली जायची. त्यासाठी लागणारी 'काजं' (Buttonholes) सुद्धा हातानेच विणली जायची. याला 'पोटली बटन' किंवा 'चायनीज फ्रॉग क्लोजर' (Chinese Frog Closures) असही म्हणतात. ​भारतातील सद्यस्थिती: आपल्याकडे रोजच्या वापरातून ही गुंडीची बटणे आता जवळपास हद्दपार झाली आहेत. फक्त काही पारंपरिक शेरवानी, कुर्ते किंवा डिझायनर कपड्यांमध्येच ती फॅशन म्हणून क...

१७५ वर्षाची पूर्ण प्राथमिक शाळा आताची आदर्श जीवन शिक्षण शाळा. नंबर १ मालगुंड.

Image
आमची शाळा 175 वर्षाची झाली म्हणून आपण श्री गणेशा जिथून शिकलो त्याबद्दल काही लिहाव असे वाटले म्हणून हा लेख लिहीत आहे.आत्ताची मालगुंड ची जीवन शिक्षण शाळा ही पूर्वी पूर्ण प्राथमिक शाळा मालगुंड या नावाने होती, शाळेची स्थापना १९५१ साली झाली. पाच जून रोजी या शाळेला १७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या शाळेबद्दल हा लेख मी लिहीत आहे. १९५५ साली मी या शाळेत पहिली मध्ये दाखल झालो. म्हणजे सुमारे ७५ वर्षापूर्वी. गणपतीपुळे खाडी पार करून मालगुंड मध्ये शिरल्यानंतर पुढे काही अंतरावरच डाव्या बाजूला आमची ही जीवन शिक्षण शाळा आहे. त्यावेळी इंग्रजीची C आकारामध्ये दगडी बांधकामाची मजबूत होती आणि आताही अशीच आहे. जमिनी शेणाने सारवलेल्या  असत, प्रत्येक विद्यार्थी आपली बैठक गोणपाटाची घेऊन येत असत. शाळेच्या पुढील भागामध्ये एक सुंदर बाग होती. आम्ही शाळेत जायला लागल्या नंतर काही वर्षांनी त्या बागे मध्ये झोपाळा, गोलाकार फिरणारे चक्र, सिसॉ आणि घसरगुंडी हे लाकडाचे चार प्रकार लागले . त्याच्या सभोवती छान पैकी बगीचा केला गेला होता. शाळेच्या इतर तिन्ही भागांमध्ये साधारण सात आठ फूट जागा सोडून निगडी च्...

मी आणि संगीत...

Image
तसा माझा आणि संगीताचा संबंध अगदी लहानपणा पासून. गावामध्ये झोपाळ्यावर रोज संध्याकाळी शुभम करोति, रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि त्यानंतर काही श्लोक झाल्यावर आमच्या आत्या आम्ही सर्व भावंड आणि  शेजारची आलेली काही मुले असे सर्व जुनी गाणी रोज म्हणत मोठे झालो. त्यावेळी आशा भोसले ,लता मंगेशकर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपुर यांची भावगीते जास्ती करून आमच्यापेक्षा मोठी असलेल्या ताई आणि आत्या या म्हणत असत. नंतर आम्ही आमच्या शाळेतील कविता मोठ्याने म्हणायचो. हे रोजचे कार्यक्रम. रामनवमीला वगैरे गावातील देवळामध्ये भजन कीर्तन चालायचे. तसे काही संगीत नाटके गावात कधीतरी येणारे नाटक कंपनी सादर करायचे ,ते पाहायला आणि ऐकायला मात्र आम्ही जात असोत. नाटकातील एखादे संगीत कलाकार पुण्या मुंबईवरून येत असत. संगीत सौभद्र, मंदार माला,स्वयंवर अशी आणि इतर नाटके ते करत. भार्गवराम आचरेकर हे एक चांगले आठवतात! बाकी शाळेतील शारदोत्सवा मध्ये आम्ही लहान मुलांनी केलेली, नाचलेली गाणी आणि काही मुलींचीच नृत्य आणि गाणी होत असत. गावातील हौशी तबला आणि पेटी वादक अशा कार्यक्रमाला साथ देत. विठ्ठल मंदिरात होणाऱ्या नाटकामध्य...

हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था कशी असते..

Image
हृदयविकाराच्या आधी आणि नंतर शरीराची अवस्था ..शिप वरती केलेल्या पंधरा वर्षा मधील कामे आणि वादळी संकटे ,टेन्शन च्या परिणामा मुळे कीवा नंतर दोन वर्ष शिप रिपेरिंग वर्क शॉप मध्ये आलेले टेन्शन आणि शरीराचे झालेले हाल, म्हणजे कोणत्याही वेळी,दिवस आणि रात्री अवेळी किती वेळ दग दग आणि कमी झालेली झोप यामुळे पण माझा वयाच्या 38 वर्षी डावा हात दुखायला सुरुवात झाली. पहिले दोन-तीन महिने विशेष लक्ष दिले गेले नाही.नंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना स्पॉंडि लायसिस वाटले. त्यावर त्यांनी मानेला बांधायचा पट्टा दिला. तो दोन-तीन महिने वापरला, हात दुखत होताच.नंतर एक दोन महिन्या नंतर डोळे ओढल्या सारखे वाटायला लागले. डोळ्याला नंबर आहे म्हणून चष्मा दिला पण पॉइंट 0.25 होता.तरीही हात दुखत च होता. थोडा थोडा दम लागत होता. नोकरी चालूच होती शिप रिपेरिंग काम चालू होतं. शिव वरती वर खाली ड्रायडॉक मध्ये अशी खूप दगदग व्हायची.एक दिवस ड्रायडॉक मध्ये शिप असताना  खूपच दम लागू लागला. चार पावलं चाललं पण कठीण होतं होत, सोबतच्या एका कामगाराला घेऊन घड्याळ गोदी ते मशिद बंदर कसा बसा थांबत थांबत गेलो. आणि तासा भरात रेल्व...

वेळ काही पूरत नाही....

आयुष्य वाढते वेळ काही पुरत नाही,                                राहिलेल्या कामांची लिस्ट काही संपत होत नाही !                                            बालपणीच्या, तरुणपणीच्या, नोकरी करत असतानाच्या, आठवणी लिहायला वेळ काही पुरत नाही!                             मित्र,मैत्रिणीचे लहानपणीचे चेहरे आठवतात,                    प्रत्यक्ष भेटीत ओळखता येत नाही!                                                           नव्या जगात नव्या युगात मोबाईल वरील खंडीभर ॲप मुळे,                    ...

मोबाईल पेंटिंग एक छंद...

Image
तशी मला लहानपणापासूनच ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड होती. साधारण तिसरी,चौथीचा असताना शाळेमध्ये दसऱ्याला पाटी वरती आम्ही सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा करायचो .बहुतेक सर्वजण एक एक आकडा काढून त्याचं रांगोळी सारखं चित्र काढायचे. मी मात्र सरस्वती देवीचा फोटो काढायचा प्रयत्न करायचो आणि ते बऱ्यापैकी चांगलं व्हायचं. हळूहळू पुढे माझे काही मित्र पण माझ्याकडून त्यांच्या पाटी वर चित्र काढून घेत. लहानपणी रफ पेपरवर मी खूप रेखाचित्र काढायचो .त्यावेळी आमच्या बाजूला एक गोखले मास्तर म्हणून राहत होते. ते मला कधी कधी थोड गाईड करत. आठवीमध्ये गेल्यानंतर मला इंग्लिश शाळेमध्ये चित्रकला विषय होता ते बहुदा कोसुंबकर किंवा मेहंदळे गुरुजी शिकवायचे. त्यांना माझी चित्रे  खूप आवडायची. त्यांनी  मला ड्रॉइंग च्या पहिल्या परीक्षेला बसवले . आणि पुढील वर्षी लगेच दुसऱ्या परीक्षेला बसवले . मी परीक्षा पण पास झालो. महाराष्ट्र शासनाची परीक्षा असायची. शाळेमध्ये असताना देखील क्लास चालू असताना  वहीच्या मागील पानांवर मी असंच रेखाटन करायचो. असा कधीच दिवस गेला नाही की मी क...

एक अस्मरणीय प्रवास...

Image
एक अविस्मरणीय प्रवास......डिसेंबर १९८१चा तिसरा आठवडा होता.खूप मोठ्या वादळाला तोंड दिल्यानंतर आमची शिप सुखरूपपणे इटलीमधील ट्रीएस्ट या बंदरावर आल्यावर तिथून मी त्याच दिवशी संध्याकाळी सुटी वरती येण्यासाठी शिप वरून उतरलो. माझं Alitalia चे रोम मार्गे मुंबईच तिकीट दुसऱ्या दिवशी सकाळच होतं पण अचानक  खूप बर्फ पडायला सुरुवात झाली आणि एअर पोर्ट वर वर बर्फ जमा झाल्याने सर्व विमाने रद्द झाली. दोन दिवस मी हॉटेल मध्येच अडकून राहिलो. सकाळच्या वेळी थोडे शहरात फिरून येत असे पण  बर्फ असल्यामुळे जास्त काही फिरायला जमायचं नाही. चौथ्या दिवशी सकाळी माझं फ्लाईट रोमला जायला निघाल. रोम हून माझं डायरेक्ट फ्लाईट Alitalia चे मुंबईच होतं पण दोन दिवस उशीर झाल्यामुळे मला जे विमान मिळेल त्याप्रमाणे  जायला लागत होते. दहा तास मला रोम एअरपोर्ट वरती थांबायला लागलं मुंबईच्या साठी.रोम एअरपोर्ट वर  सर्वात जास्त म्हणजे दहा-बारा तास बसून होतो. आणि या सर्व दहा-बारा तासात माझ्याकडे असलेले भरपूर सामान प्रत्येक वेळी बाथरूम मध्ये जाताना मला बरोबर घेऊन जायला लागत होत कारण मी एकटा होतो अर्थात मी एक पोर...

सेकंड इनिंग...

Image
  आधी शिप वरील नंतर मुंबईच्या धावपळीच्या नोकरी नंतर पुण्यात फक्त आराम च करायचा असा विचार करून २०१२ साली रिटायरमेंट घेतल्यानंतर मी आणि माझी पत्नी पुण्याला मुलाकडे राहायला आलो. पहिले काही दिवस खाणे ,पिणे ,फीरणे यात दिवस कसे गेले कळले नाही. पण इतर दिवस भर काय करायचं असा प्रश्न पडला.त्या वेळी मी नवीनच स्मार्ट फोन घेतला होता.ड्रॉइंग आणि पेंटिंग करायची मला आवड होती म्हणून मोबाईल वर ड्रॉइंग पेंटिंग ॲप पाहून वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉइंग करायला सुरुवात केली. मोबाईल मुळे पेंटिंग करण्या साठी लागणारे रंग पाणी ब्रश हे सर्व ॲप मध्ये असल्यामुळे मूड आला की एका जागी बसल्या बसल्या वीस पंचवीस मिनिटात एक चित्र होऊन जायचं .जसं तसं मनात असायचं तसं. हा फावल्या वेळेत ला छंद मला लागला. मूड लागला की खूप चांगली चांगली पेंटिंग झाली. मित्रांच्या सल्ल्यामुळे एकदा मी माझ्या मोबाईल पेंटिंग वरील मित्राचं प्रदर्शन पुण्यामध्ये केलं ज्येष्ठ चित्रकला कलाकार श्री. मंगेश तेंडुलकरांना माझी पेंटिंग आणि मोबाईल पेंटिंगचा प्रकार खूप आवडला. एक ज्येष्ठ युट्युबर श्रीमती मधु सागर आणि माझी एक मुलाखत देखील घेतली . ती खूप जणांना आवड...

कोकणातील विहिरीवर बसवलेले रहाट गाडगे...

Image
माझ्या लहानपणीच्या आठवणीतील कोकणातील आणखीन... आता कुठे सहसा न दिसणारी गोष्ट म्हणजे विहिरीवर बसवलेले रहाट गाडगे. कोकणातील जास्त करून विहिरी गोल आकाराच्या असायच्या. विहिरी वरती हात रहाट, पाय रहाट, आणि पाय रहाटाला वाढवून त्याला पुढे दोन गोल लाकडा मध्ये तयार केलेले गेअर लावून तो रहाट रेडा किंवा बैल याला लावून चालवला जायचा. हे सर्व लाकडाचे असायचे. आणि हे सर्व तयार करणारे गावातीलच सुतार असायचे. हात रहाटा ला दोरी बांधून त्याला घागर किंवा बादली लावून विहिरीतून पाणी काढले जात असे. पाय रहाट  हात आणि पाय याचा उपयोग करून फळी वर बसून चालवायचा. मी तो चालवला आहे . तिसरा प्रकार जास्ती करून वाडी मधील नारळ, पोफळी, केळी व इतर फळ झाडे यांच्यासाठी एक जनावर साधारण सकाळी दीड दोन तास आणि संध्याकाळी एक तासभर रहाटा वरून पाणी काढत असे. जनावराला त्याचे डोळे बांधून ठेवलेले असल्यामुळे ते जनावर गोल गोल फिरत असे आणि त्यामुळे रहाटाचे ते पाणी काढणे चालू असायच. चित्रांमध्ये त्याचं चित्र आहे ते आपण पाहावं. गावांमधील काही लोकांकडे असे रहाट गाडगे असायचे . ज्यांच्याकडे गुरे असायची आणि मोठी बाग असायची त्यांना...

माझे मोबाईल पेंटिंग... एक विरंगुळा

Image
तशी मला लहानपणापासूनच ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड होती. साधारण तिसरी,चौथीचा असताना शाळेमध्ये दसऱ्याला पाटी वरती आम्ही सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा करायचो .बहुतेक सर्वजण एक एक आकडा काढून त्याचं रांगोळी सारखं चित्र काढायचे. मी मात्र सरस्वती देवीचा फोटो काढायचा प्रयत्न करायचो आणि ते बऱ्यापैकी चांगलं व्हायचं. हळूहळू पुढे माझे काही मित्र पण माझ्याकडून त्यांच्या पाठीवर चित्र काढून घेत. लहानपणी रफ पेपरवर मी खूप रेखाचित्र काढायचो .त्यावेळी आमच्या बाजूला एक गोखले मास्तर म्हणून राहत होते. ते आमच्या शाळेमध्ये पण संस्कृत हिंदी शिकवायचे. ते मला कधी कधी थोडाफार गाईड करत. आठवीमध्ये गेल्यानंतर मला इंग्लिश शाळेमध्ये चित्रकला विषय होता ते बहुदा कोसुंबकर किंवा मेहंदळे गुरुजी शिकवायचे. कोसुंबकर सर आणि मेहंदळे सर होते त्यांना मी चित्र काढलेले खूप आवडायची. त्यांनी  मला ड्रॉइंग च्या पहिल्या परीक्षेला बसवले . आणि पुढील वर्षी लगेच दुसऱ्या परीक्षेला बसवले . मी परीक्षा पण पास झालो. महाराष्ट्र शासनाची परीक्षा असायची. शाळेमध्ये असताना देखील क्लास चालू असताना  वहीच्या...

Shri Kshetra Ganapatipule..

Image
Shree Kshetra Ganapatipule, a self-proclaimed Ganesha among many tourist spots in Maharashtra, is famous since the Peshwa period. This is historical temple of Swayambhu Shri Ganesha in the huge mountains by the bottomless blue sea. Swayambhu Ganesha idol is facing west. All the people nearby villages believe that the entire mountain with this idol is Lord Ganesha. Everyone feels satisfied seeing the very happy idol in the heart. The gabhara of the main temple is three-four Down the stairs and is about six by six. The idol coated with two GandSthalas and bright eyes is decorated with beautiful flowers every morning after Ganapati bath. On the left side of the idol, a white tooth can be seen prominently. Earlier this temple was Koularu like other temples in Konkan. There are three Deepmalas on the left and right sides of the temple from very early times. Now after the restoration of the temple, further improvements have been made. Before entering the temple, there was a sprin...

Shri Kshetra Ganapatipule..

Image
Shree Kshetra Ganapatipule, a self-proclaimed Ganesha among many tourist spots in Maharashtra, is famous since the Peshwa period. This is historical temple of Swayambhu Shri Ganesha in the huge mountains by the bottomless blue sea. Swayambhu Ganesha idol is facing west. All the people nearby villages believe that the entire mountain with this idol is Lord Ganesha. Everyone feels satisfied seeing the very happy idol in the heart. The gabhara of the main temple is three-four stairs down and is about six by six. The idol coated with two GandSthalas and bright eyes are decorated with beautiful flowers every morning after Ganapati bath. On the left side of the idol, a white tooth can be seen prominently. Earlier this temple was Koularu like other temples in Konkan. There are three Deepmalas on the left and right sides of the temple from very early times. Now after the restoration of the temple, further improvements have been made. Before entering the temple, there was a spring o...